प्रतिबिंब - अभिषेक दळवी (korean ebook reader TXT) 📗
- Author: अभिषेक दळवी
Book online «प्रतिबिंब - अभिषेक दळवी (korean ebook reader TXT) 📗». Author अभिषेक दळवी
आईबाबांना गाडीत बसवून माझ्या एका मित्राने सांगितलेल्या फर्निचरच्या दुकानाकडे मी गाडी वळवली .वीस पंचवीस मिनीटांच्या प्रवासानंतर ते दुकान आलं त्यात जायला गाडीतून उतरणार तोच हिचा फोन वाजला तिच्या एका मैत्रिणीने एक दुकान सूचवलं .हे दुकान समोर अगदी दहा पावलावर दिसत असताना मला तिने सांगितलेल्या दुकानाकडे गाडी वळवावी लागली ते इथून जवळ जवळ दीड किलोमीटर लांब होतं अर्ध्या रस्त्यात आमची गाडी पोचली न पोचली तोच तिचा फोन पुन्हा खणखणला आता तिच्या बाबांचा फोन होता त्यांच्या एका मित्राने अजून एक दुकान सुचवलं होत मला तिथूनच तिच्या बाबांच्या मित्राने सांगितलेल्या दुकानाकडे गाडी वळवावी लागली .एक किलोमीटरच्या प्रवासानंतर ते दुकान त्या दुकानासमोर मी गाडी थांबवली हिचा फोन पुन्हा वाजेल आणि कोणीतरी अजून एक दुकान सुचवेल अशी भीती मला वाटत होती पण सुदैवाने तस काही झाल नाही .लग्नानंतर नवऱ्याचा कसा माकड होतो असे विनोद मी लग्नाआधी फार ऐकले होते ते विनोद नसून वास्तव आहेे याची जाणीव आज मला प्रकर्षाने होतं होती .
. . . एका केस मिश्या पिकलेल्या ,ढेरपोट्या , सफेद शर्ट काळी पँट घातलेल्या मारवाड्याने आमच स्वागत केल तो दुकानाचा मालक असावा त्याने एका क्रुश , वयस्कर अशा फिक्कट शर्ट ,पोटावर चढवलेली पँट असा काहीसा अवतार असणाऱ्या सेल्समनकडे आम्हाला सूपूर्त केल .तन्वी त्याच्याबरोबर निघाली मी तिथल्याच एका सोफ्यावर शांतीने बसलो मला वाटलं होत हे काम अर्ध्या पाऊण तासात अाटपून घरी जाऊ पण इथे यायलाच तिने पाऊण तास लावला होता .मी शांतीने बसलेल तिला मानवलं नसाव " असा काय बसलायस चल ना तुला दाखवते किती मस्त मस्त सोफासेट आहेत " अस बोलून माझा हात धरून घेऊन गेली .तिला तिची चॉइस मला दाखवायची होती किंवा माझी परवानगी घ्यायची होती अस काही नाही बरं .ती ते खरेदी करताना मी फक्त तिथे उपस्थित असंन गरजेचं होतं .म्हणजे भविष्यात कधी तिने घेतलेल फर्निचर टिकलं नाही आणि त्यावरून तिला मी काही म्हणालो मग " मला दोष देऊ नकोस तू पण होतास ना घेताना माझ्याबरोबर मी माझ्या मनाने घेतलं का ?" हे तीच उत्तर तयार असणार होतं .तिकडे होते ते सगळे सोफा सेट तिने जवळ जवळ तीनदा पुन्हा पुन्हा पाहिले असतील नंतर काही वेळाने एक निवडला . डायनिंग टेबलच्या बाबतीतही तेच केल .आता बाकी राहिलं फक्त ड्रेसींग टेबल तिने तिकडे मोर्च्या वळवला सगळी ड्रेसींग टेबल तिने दोनदा पाहिली तरीही तिला कोणतं घ्यावं कळत नव्हतं .कोपऱ्यात एक ड्रेसींग टेबल कपड्याने झाकून ठेवलं होतं तिने सेल्समनला तो कपडा काढायला सांगितला त्यावर " अरे मॅडम ये पुराना है इसे देखकर क्या करोगे इतने अच्छे अच्छे है वो देख लो नं " म्हणत त्याने नकार दिला .
तन्वीही हट्टी होती ती तो कपडा काढायला मागे लागली त्यावर तो सेल्समनही " अरे मॅडमजी मई कह रहा हूँ ना यह ठीक नही है वो उधर देखो वो दो टेबल नये आये है मार्केट मे वो देख लीजिए " म्हणत तो तिला दुसऱ्या टेबलांकडे घेऊन जाऊ लागला .त्याच्या मनात आम्हाला ते दाखवायचच नव्हतं .तन्वी हट्टालाच पेटली त्याच्याशी हुज्जत घालू लागली ते पाहून त्या दुकानाचा मालक तो मारवाडी आमच्याजवळ आला त्याने त्या सेल्समनला जायला सांगितल तसा तो सेल्समन नाईलाजाने निघून गेला त्या मारवाड्याने त्या वरचा कपड़ा काढला ते ते ड्रेसींग टेबल अगदी सुंदर होत मॉडेल जून होत पण छान होत .सर्वात महत्वाच म्हणजे आरसा तो फारच छान होता छान म्हणजे अगदी वेगळाच होता जस एखाद्या जवाहीराच्या दुकानात साधे स्फटिक नकली हीरे म्हणून ठेवावेत त्या मधे एक असली हीरा ठेवावा तरीही कोणत्याही नवख्या ग्राहकाने केवळ चकाकी वरून असली हीरा लगेच ओळखावा तशी काहीशी चकाकी त्या आरशाला होती बाकी ड्रेसिंग टेबलच्या आरशापेक्षा तो उठून दिसत होता त्या आरशाच्या कोपऱ्यात दोन छोटे ओरखडे होते आधी वाटलं नक्षी असेल पण ती एक खूण होती सहजा सहजी लक्षात येत नव्हती .तो सेल्समन आम्हाला म्हणाला होता की हे टेबल ठीक नाही जुनं आहे वैगरे त्या बद्दल मी त्या मालकाला विचारलं त्यावर त्यांने " अरे नई साब इन लोगो को कुछ पता नई .इसका थोडा पॉलिशिंग बाकी था पर वो कल ही पूरा हो गया अब ये पूरा रेडी है " अस त्याने उत्तर दिलं तेव्हा माझ लक्ष मगासच्या सेल्समनकडे गेल तो चोरून आमच्या दिशेने पाहत होता . माझ त्याच्याकडे लक्ष गेल पाहून तो तिथून निघून गेला .
आपण ही कथा आतापर्यंत जास्तीच जास्त पाहिलीच असेल आणि आशा आहे आपल्याला ही आवडली असेल . या कथेत पुढे काय होत हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला संपूर्ण कथा वाचावी लागेल .पूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा amazon kindle वेबसाईटवर जाऊन “प्रतिबिंब “ किंवा writer abhi टाईप करून पूर्ण पुस्तक प्राप्त करा
https://www.amazon.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%A2%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-Marathi-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%80-ebook/dp/B086R4CGP1/ref=sr_1_2?dchild=1&keywords=abhishek+dalvi&qid=1586019155&s=digital-text&sr=1-2
(47)
अभिषेक दळवी
ImprintPublication Date: 04-04-2020
All Rights Reserved
Comments (0)