bookssland.com » Romance » कदाचित हेच आहे प्रेम - अभिषेक दळवी (best e reader for manga txt) 📗

Book online «कदाचित हेच आहे प्रेम - अभिषेक दळवी (best e reader for manga txt) 📗». Author अभिषेक दळवी



1 2 3 4 5 6 7 8 9 10
Go to page:
तिच्याकडे पाहणार इतक्यात दरवाजातून एक तीस पस्तीस वर्षाची स्त्री आत आली त्या प्रोफ़ेसर वाटत होत्या पहिला लेक्चर त्यांचाच असावा .

कॉलेजच्या पहिल्या दिवशी ज्या गोष्टी होतात त्याच आता सुरू होत्या .प्रत्येक जण उभ राहून आपापली ओळख सांगत होता .पहिल्या रो च्या सगळ्या मुलींनी आपली ओळख सांगितली होती .आता दुसऱ्या रो च्या मुलींची वेळ होती .मला या टाईमपासमध्ये काही रस नव्हता म्हणून मी दुर्लक्ष करत होतो .,तितक्यात माझ्या डोक्यात प्रकाश पडला ह्या मुली आपली ओळख सांगत आहेत म्हणजे मघाशी ज्या मुलीला मी पाहत होतो तीच नाव सुद्धा मला कळू शकतं .तिच्या मागे एक बेंच सोडून बसलेली मुलगी आता इन्ट्रोडक्शन देत होती .तीन मुलींनंतर तिचा नंबर होता मी लक्ष देऊन ऐकू लागलो .मागच्या बेंचवर बसलेली मुलं गोंधळ करत होती .पहिला दिवस असल्याने मॅमही त्यांना काही बोलत नव्हत्या .पण त्यांच्या आवाजामुळे मला मुलींच्या तोंडून येणारा आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता .आता काहीही करून मला ही सुवर्णसंधी सोडायची नव्हती .माझ्या बाजूच्या मुलीचं नाव माहिती करून घ्यायच मी पक्क ठरवल .डोळे घट्ट मिटून कानांत प्राण एकटवून मी तीच नाव ऐकण्यासाठी तयार झालो आणि तिचा नंबर आला .

" स्मिता जहांगीरदार " बोलून ती खाली बसली .

तिचे ते शब्द , तिचा तो आवाज कितीतरी वेळ माझ्या कानांत घुमत होता मी डोळे मिटून माझ्याच विश्वात गुंग होतो .मला भानावर आणलं ते माझ्या शेजारी बसलेल्या मुलाने .स्मितानंतर तिच्या पुढच्या तीन मुली माझ्या पुढे बसलेल्या मुलाचा नंबर कधी येऊन गेला मला अजिबात कळलदेखील नाही .मी पटकन उठलो .

" अभिमान देशमुख ...नाशिक " बोलून मी पटकन खाली बसलो .

पण त्या मॅमनी मला पुन्हा उठवलं

" अभिमान तू नाशिकमधून पुण्याला आलास ??" त्यांनी विचारलं .

" हो .अॅकचुअली तिथे जवळ पास चांगली कॉलेजेस नव्हती ." मी म्हणालो .

" नाशिकला बी एस्सीच एकही चांगल कॉलेज नाही ??" मॅमनी विचारलं .

" बी एस्सी नाही .मेकॅनिकल "

" तू इंजिनियरींगचा स्टुडंट आहेस ??"

" हो "

" अरे मग बी एस्सीच्या क्लास्समध्ये काय करतोयस ??"

" हा बी एस्सीचा क्लास आहे ??" मी आश्चर्याने किंचाळतच विचारलं .

माझ्या या प्रश्नावर क्लासमधली सगळी मुल जोर जोरात हसू लागली .ज्या चार मुलांमुळे मी लेडीज वॉशरूममध्ये घुसलो होतो त्यांचावर पुन्हा विश्वास ठेऊन मी चूक केली आहे ही गोष्ट आता माझ्या लक्षात आली होती .सगळे माझ्यावर हसत आहे पाहून मला फारच एंबॅरसिंग वाटायला लागलं .मी लगेच बॅग उचलून त्या क्लासरूममधून बाहेर निघून ग्राउंड फ्लोअरवर आलो .ज्यांनी मला फसवल होतं ती चार मूलं आता कुठेच दिसत नव्हती .माझी मम्मी नेहमी म्हणायची

" अभी तू थोडा भोळाच आहे ." त्यावर पप्पा लगेच बोलायचे

" अशा स्वभावाला भोळेपणा नाही बालिशपणा म्हणतात ." मी किती बालिश आहे याची आज मला प्रकर्षाने जाणीव होत होती .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

स्मिता..........

आज एक गंमतच झाली .एक मुलगा आमच्या क्लासमध्ये आला .तसा वीस पंचवीस मिनिट उशीराच आला होता .दिसायला गोरा गोमटा नसला तरी सावळाही नव्हता .माझ्याच बाजूच्या बेंचवर येऊन बसला होता . तो होता इंजीनियरिंगचा स्टुडंट पण मॅडम त्याची इन्ट्रो विचारेपर्यंत बिचाऱ्याला माहीत नव्हत की तो बी एस्सीच्या क्लास्समध्ये येऊन बसलाय .

" जगात बावळट लोकांची काही कमी नसते ." अस मी नाही माझ्या शेजारी बसलेली मुलगी बोलली .

त्याचा किस्सा आठवून आठवून आम्ही मुली दिवसभर हसत होतो .कुसुम मला सांगत होती

" किती क्युट होता ना तो मुलगा .तुला माहितीये स्मिता. तो फार वेळ तुझ्याकडेच पाहत होता ."

तीच म्हणणं खर असेल ही कदाचित कारण नोव्हेल वाचताना माझ त्याच्याकडे लक्ष गेल होत .तेव्हा तो माझ्याकडेच पाहत होता .

तो मला पाहत असेलही कदाचित पण कोणी मुलगा मला पाहतो आहे याचा मला आनंद ही नव्हता आणि दुःखही .अशा गोष्टींची माझ्या आयुष्यात काही किंमत नव्हती . कारण माझ लग्न ठरल होत .

मी स्मिता ...स्मिता जहांगीरदार . जहांगीरदारांच्या घरातली एकुलती एक मुलगी .दादानंतर आठ वर्षांनी माझा जन्म झाला आणि जहांगीरदारांच्या वाड्याला कन्यारत्न प्राप्त झाल .माझ्या वडिलांना फक्त मुलगेच हवे होते मुलगी नको होती .पण देवाने माझ्या आईची इच्छा ऐकली आणि तिच्या पोटी एक मुलगी जन्माला आली .

आम्ही जहांगीरदार म्हणजे खानदानी जमीनदार .स्वातंत्र्यापूर्वी कित्येक गावांमध्ये आमची जमीन होती .अजूनही आम्ही तीनशे एकर जमिनीचे मालक आहोत .बाबा आमदार आहेत त्यामुळे घरात पैसा अडका , धनधान्य , इज्जत सगळकाही होत .मला पूर्वीपासून कसल्याच गोष्टीची कमी नव्हती .मी लहानपणी पासून श्रीमंतीत आणि लाडात वाढले होते पण तरीही माझ घर म्हणजे मला एक प्रकारचा पिंजराच वाटायचा .

हो ....' सोन्याचा पिंजरा ' कारण लहानपणापासून मला कसलही स्वातंत्र नव्हत होती ती फक्त बंधन .बाबा लहानपणापासून मी जे काही मागायचे ते अगदी क्षणात माझ्यासमोर हजर करायचे पण म्हणून त्यांच माझ्यावर प्रेम होत अस मी कधीच म्हणणार नाही कारण त्यांच्या प्रत्येक कृतीतून एक प्रकारची महत्वाकांक्षा , घमेंड जाणवायची की माझ्या मुलांची कोणतीही इच्छा मी चुटकीसरशी पूर्ण करू शकतो .इतर मुलींना जस वडिलांच प्रेम मिळत तस मला कधीच मिळाल नाही .बाबांनी मला कधी कुठे फिरायला नेल नाही , मी आजारी असताना कधी मांडीवर घेऊन झोपवल नाही , इतकंच काय कधी प्रेमाने दोन गोष्टी बोलले देखील नाहीत . त्यांच्यासाठी मी फक्त एक जवाबदारी होते निव्वळ एक जवाबदारी .माझ्या लग्नानंतर यातून ते मोकळे होणार होते .

माझी बारावीची परीक्षा झाल्यानंतर दोन महिन्यांनी दादाच लग्न होणार होत .लग्ना आधी सगळ्यांसोबत माझ्या हातावरही मेहंदी लावली गेली .तेव्हाच बाबांनी घरातल्यांसमोर जाहीर करून टाकल ह्या मेहंदीचा रंग उतरायच्या आत माझा साखरपुडा उरकून टाकायचा .मला अजून पुढे शिकायचं होत पण माझ्या बाबांच्या मत अस होत " मुलींना जास्त शिकवून करायचय काय ?? शेवटी त्यांना घरचं तर सांभाळायच असत ."

मी अकरावीत असतानाच त्यांनी त्याच्या मित्राच्या मुलाबरोबर माझ लग्न ठरवून टाकल होत .यात बाबांचा स्वार्थही होताच .त्यांचे ते मित्र मंत्री होते .जर त्यांच्या मुलासोबत माझं लग्न झालं तर बाबा त्यांच्या मदतीने भविष्यात मंत्री बनू शकत होते .मी त्या मुलासोबत आयुष्यभर सुखी राहू शकेन की नाही हा विचार त्यांच्या मनात अजिबात आला नाही .ज्याच्याशी माझ लग्न ठरल होत त्याच्या घरी एक दोनदा मी जाऊन आले होते .दादाच्या लग्नात मी त्याला पहिल्यांदा पाहिलं .तो मुलगा माझ्यापेक्षा जवळ जवळ सात ते आठ वर्षांनी मोठा होता .आडदांड शरीर , गळ्यात जाडजुड़ सोन्याच्या चैन , वाढलेल्या दाढी मिश्या असा काहीसा अवतार त्याला पाहूनच मला भीती वाटली .दोन चार रिकाम टेकड्या पोरांबरोबर जीपमधून गावभर फिरायचं , बारमध्ये मारामाऱ्या करायच्या, मुलींची छेड काढायची इतकंच काय त्याच्यावर तीन एक्स्ट्रॉशनच्या केसेससुद्धा होत्या .पण बाबांना या गोष्टींनी काही फरक पडत नव्हता .एका श्रीमंत घरात माझी पाठवणी करून ते माझ्या जवाबदारीतून मुक्त होणार होते .

दादाच्या लग्नादिवशी घरात आनंदी आनंद होता पण या आनंदाला मी अपवाद होते .मला माझ भविष्य दिसू लागलं होत . माझी आई बी एड पास होती .तिला लहान मुलांना शिकवायची फार आवड होती पण बाबांनी कधीच तीच इतक साध स्वप्न पूर्ण होऊ दिल नाही .आमचा वाडा म्हणजेच तीच विश्व होत .वाड्याबाहेर स्वतःच्या मर्जीने ती जास्तीच जास्त गावच्या मंदिरापर्यंत जाऊ शकत होती . घरातली स्त्री ही घरची लक्ष्मी असते .घर सांभाळण्याचा हक्क तिच्याकडे असतो पण बाबांसाठी माझ्या आईची किंमत एका मोलकरणीपेक्षा जास्त कधीच नव्हती .दिवसभर ती घरची काम करायची पण तरीही आजीकडून ओरडा मिळायचा .रात्री उशीरा बाबा दारू पिऊन यायचे ते कधी तिच्याशी प्रेमाने बोललेले किंवा तिला कोणती गिफ्ट आणल्याच मी पाहील नव्हत पण बाहेर काही बिनसल तर त्याचा राग मात्र तिच्या वरच काढायचे .कधी कधी हात ही उचलायचे .

ज्या घरात मी लग्न करून जाणार होते तिथेही अशीच परिस्थिती होती .मला हे अस आयुष्य जगायचं नव्हतं .माझ्या जीवनात काही फार मोठी स्वप्न नव्हती . फक्त समजून घेणारी माणस , प्रेम करणारा नवरा , एक शांत सुखी कुटुंब हव होत .पैसा , दागदागिने , गाडी नसल तरी चाललं असत पण आईसारख प्रेम करणारी सासू , अधून मधून थट्टा मस्करी करणारे सासरे , सुट्टिच्या दिवशी हातात हात घालून सिनेमाला नेणारा नवरा इतक्या साध्या इच्छा होत्या पण कदाचित हे सुख माझ्या नशिबात नव्हत .

माझी एक आत्या होती दोन वर्षापूर्वी ती वारली .तीच गावातल्याच एका गरीब मुलावर प्रेम होत पण आजोबांनी तीच जबरदस्तीने दुसऱ्याच एका माणसासोबत लग्न लावून दिल .लग्नानंतर दोन वर्ष तिला मूल झाल नाही म्हणून तिचा नवरा तिला इथे सोडून गेला तो परत न्यायला कधी आलाच नाही .काही महिन्यांनी कळल त्याने दुसर लग्न केलं पण दूसरी बायकोही त्यांना मूल देऊ शकली नाही कदाचित तिच्या नवऱ्यातच दोष असावा. पण या सगळ्यामुळे आत्या अगदी एकटी पडली तिला नंतर नंतर वेड्याचे झटकेही येऊ लागले . त्यातच ती बरळायची .

" बाईचा जन्मच वाईट ....पोरींनी ना पळून जाऊनच लग्न केली पाहिजेत ......मी ...मी पळून गेले असते ना ...तर आज फार फार खुश असते ."

तिला वेडी समजून सगळे तिच्याकडे दुर्लक्ष करायचे पण तिचे ते शब्द नेहमी मला आठवायचे .कधी कधी मला वाटायच आपल्यावर प्रेम करणारा एखादा मुलगा शोधावा आणि त्या बरोबर या सगळ्यापासून फार दूर जाव पण तेव्हाच आईचा चेहरा डोळ्यांसमोर यायचा .मी जर अस काही केल तर तीच काय होईल या विचारानेच माझा थरकाप उड़ायचा .

बाबांनी म्हटल्याप्रमाणे दादाच्या लग्नानंतर वीस दिवसांनी माझ्या लग्नाचा मुहूर्त काढला .जस जस दिवस सरत चालले होते तस तशी माझी निराशा वाढत चालली होती .माझी ही अवस्था आईला बघवली नाही .तिने हे सर्व माझ्या मामाच्या कानावर घातल .आईनंतर जर कोणाला माझी काळजी असेल तर ती फक्त आणि फक्त मामाला .मामा जेव्हा मला भेटायला आला तेव्हा त्याच्या कुशीत जाऊन मी फार रडले .त्याने बाबांशी बोलण्याच मला आश्वासन दिल .

माझ्या मामाचा कन्स्ट्रक्शन आणि लँड डिलिंगचा बिजनेस होता .निवडणुकीच्यावेळी तो बाबांना फायनान्सशियल सपोर्ट करायचा .या मुळे बाबा त्याच ऐकतील अशी आशा मला होती .तो बाबांना भेटून माझ्या रूममध्ये आला तो पर्यंत रडून रडून माझे डोळे लाल झाले होते .त्याच्याकडे पाहून तो काहीतरी चांगली बातमी घेऊन आला आहे असं वाटत होतं .

" गुड्डी, तुझ लग्न तुझ्या बाबांनी ठरवलेल्या मुलाशी होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे यात मी काही करू शकत नाही ." मामा म्हणाला .ते ऐकून मला पुन्हा रडू आलं.

" अग ऐकून तर घे एक खुशख़बरसुद्धा आहे ."

" काय ??"

" आधी डोळे पुस मगच सांगेन ."

" काय ?" मी डोळे पुसत विचारलं .

" तुझ लग्न मी तीन वर्ष पुढे ढकललय .तुझ्या बाबांकडून पुढच्या शिक्षणासाठी तीन वर्षाचा टाइम मागून घेतलाय ."

त्याच बोलणं ऐकून माझ्या ओठांवर हसू उमटलं .माझ्या प्रॉब्लेमचं कायमच नाही पण तात्पुरतं सोल्युशन निघालं होतं .

माझ्यासाठी मामाने कॉलेज पाहायला सुरुवात केली .तशी माझ्या घरापासून जवळ दोन तीन छोटी मोठी कॉलेजेस होती पण त्यांचा रँक चांगला नव्हता आणि घराच्याजवळ कॉलेज असल्याने बाबांचे कार्यकर्ते म्हणजेच चमचे प्रत्येक कॉलेजमधे होते त्यामुळे त्यांचा धाक माझ्यावर राहणारच होता .लेक्चरच्या पंधरा मिनिट आधी घरातून बाहेर पड़ायच आणि शेवटचा लेक्चर सुटल्यावर लगेच घरी यायच हेच माझ कॉलेज लाईफ असणार होत .मला कॉलेज लाईफ एंजॉय करता याव म्हणून मामानेच घरापासून लांब असलेलं कॉलेज माझ्यासाठी निवडल .हे कॉलेज तस मोठ आणि फेमस होत .कॉलेजपासून जवळच एक छोटा बंगला मामाने माझ्यासाठी भाड्याने घेतला .याच कॉलेजमधे शिकणाऱ्या माझ्या ओळखीच्या पाच मुलींची राहायची सोय माझ्याबरोबर केली त्या मुळे मलाही सोबत झाली .आमच्या जेवणाखानासाठी एक बाई ठेवली .मामाने मला स्पष्ट सांगून टाकलं .

" गुड्डी, तुझ्याकडे तीन वर्ष आहेत जी काही मजा करायची आहे ती करून घे . भविष्यात तुला असा मोकळेपणा भेटेल अस मला वाटत नाही .तुला आवडणारी प्रत्येक गोष्ट कर , इथे तुला कोणी अडवणार नाही .फक्त एक गोष्ट लक्षात ठेव तुझ लग्न ठरलय त्यामुळे मुलांपासून थोड लांबच राहायच ठीक आहे .तशी तू समझदार आहेसच काळजी घे ."

इथे आल्याआल्या मी पहिल्यांदा लायब्ररी जॉइंट केली .मला आधीपासूनच वाचनाची आवड होती .मामाने ही तीन वर्ष देऊन खरच माझ्यावर फार मोठे उपकार केले होते .मी ठरवलं या तीन वर्षात मनसोक्त आयुष्य जगायच .मामाने माझ्यासाठी जे केल त्या साठी त्याचे आभार मानावे तितके कमीच होते .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अभिमान.........

आजचा दिवस एकदम खराब गेला .पहिल्यांदा त्या चार मुलांच्या नादाला लागून स्वतःची मस्करी करून घेतली नंतर बी एस्सीच्या क्लासमध्ये जाऊन पुन्हा स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली .इतक सगळं झाल्यावर सिक्स्थ फ्लोअरवरच्या माझ्या क्लासजवळ पोचलो .तिथे पाहिलं तर लेक्चर सुरू झाला होता .एक पोट सुटलेला ,केसांचा चंपु केलेला , फॉर्मल पॅन्ट खाली स्पोर्टस शूज घातलेल्या प्रोफ़ेसरने मला उशीरा आलो म्हणून तब्बल दोन तास बाहेर उभ करून ठेवलं .पहिल्याच दिवशी दोन तास काय शिकवल देवालाच माहिती .नंतर दोन प्रोफ़ेसर आले त्यांनीही असाच वेळ घेतला म्हणून मग दुपारी मेसमध्ये जायला उशीर झाला .भुकेने अक्षरश पोटात कावळे ओरडत होते .मेसमधे जाऊन पाहतो तर मेसही बंद झाली लंच टाइम संपला म्हणून अर्धा तास आधीच बंद केली होती .शेवटी बाहेर मिसळपाव खाऊन पुन्हा लेक्चरला येऊन बसलो तर शेवटचे दोन लेक्चर त्याच केसांच चंपू असलेल्या प्रोफ़ेसरने घेतले पहिल्याच दिवशी त्याने फार बोर केलं .त्याच्याकडे पाहून अस वाटत होत की पूर्ण सेमिस्टरचा सिलॅबस हा आजच संपवून टाकणार आहे .

हॉस्टेलमध्ये आलो तेव्हा जाम थकलो होतो आल्या आल्या बेडवर शरीर झोकून दिलं. कधी झोप लागली कळलंच नाही .रात्री जेवायच्या वेळेला रूममेटनी उठवलं त्यांच्याबरोबर मेसमधे गेलो तेव्हा जेवण मिळालं पण ते पाहूनच भूक मरून गेली .माझ्या घरी मम्मीच्या हातच वरण अगदी पिवळधमक घट्ट असायच पण माझ्यासमोर आता हे जे काही होत त्यात डाळ अगदी तळाला जाऊन बसलेली आणि वर फक्त पाणी दिसत होतं अस वाटत होतं आश्चर्याने डाळ बनवताना डाळीत थोडं पाणी टाकण्याऐवजी पाण्यात डाळ टाकली आहे , भाजी नक्की कोणती होती हे काही केल्या मला कळत नव्हत त्यात पाला होता , वाटाने होते, चनेही होते अजून काही असेल म्हणून शोधायचा प्रयत्न केला तर लसूण सूद्धा सापडली .ही भाजी नक्की कोणती होती हे ओळखण्यासाठी कदाचित रिसर्चची गरज

1 2 3 4 5 6 7 8 9 10
Go to page:

Free e-book «कदाचित हेच आहे प्रेम - अभिषेक दळवी (best e reader for manga txt) 📗» - read online now

Comments (0)

There are no comments yet. You can be the first!
Add a comment