bookssland.com » Romance » कदाचित हेच आहे प्रेम - अभिषेक दळवी (best e reader for manga txt) 📗

Book online «कदाचित हेच आहे प्रेम - अभिषेक दळवी (best e reader for manga txt) 📗». Author अभिषेक दळवी



1 2 3 4 5 6 7 8 9 10
Go to page:
कदाचित हेच आहे प्रेम

 

कदाचित

हेच आहे

प्रेम

 

 

 

 

 

 

 

प्रस्तावना

ही कादंबरी माझ्याकडून लिहली गेलेली पाहिली प्रेमकथा आहे .आपल्या देशाच्या इतिहासात कित्येक प्रेमकथा होऊन गेल्या आहेत .काहींनी इतिहास बनवला तर काही इतिहासात हरवून गेल्या .आजही प्रेम करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे पण आपल्या मर्जीने लग्न करायचा अजिबात नाही .

आजही कित्येक प्रेमकथा पूर्ण होतात पण काही कायमच्या अपूर्ण राहतात .जास्तीच जास्त प्रेमकथा अपूर्ण राहतात त्या मुला आणि मुलीकडील घरच्यांच्या नकारामुळे .या घरच्या मंडळींची नकार देण्याची कारणसुद्धा अगदी अफलातून असतात बरं .काही कुटुंबाना मुलगा देखणा हवा तर काहींना मुलगी कमावणारी हवी .काहींना मुलगी आपल्या जातीतली हवी तर काहींना मुलगा दुसऱ्या कुळातला हवा .काही सुनेकडे हुंडा मागतात तर काही जावयाला घरजावई बनवण्याचा हट्ट करतात .काहीवेळा मूलाकडच्यांचा होकार असतो तर मुलींकडच्यांचा नकार असतो .काही वेळा मुलीकडच्यांचा होकार असतो तर मूलाकडच्यांचा नकार असतो आणि जर दोघांकडूनही होकार असेल तर तो नकारात बदलायला कुंडलीचा दोष पुरेसा असतो .

माझ्या मते कोणावर जीवापाड प्रेम केल्यानंतर फक्त घरच्यांच्या हट्टापोटी त्यासोबत नात तोडून टाकणं, त्या पासून कायमच दूर निघून जाण, त्याला विसरून जाण या पेक्षा मोठं दुःख या जगात असूच शकत नाही .

माझी ही कथाही अशाच दोन पात्रांशी निगडित आहे .ज्यांची कुटुंब ,शहर, रस्ते एकमेकांपासून फार दूर आहेत .पण त्याचं प्रेम ,आकांशा आणि नशीब त्यांना त्यांचं आयुष्य एकत्र जगण्यासाठी मदत करत .आता त्यांचं आयुष्य म्हणजे नियतीचा मेळ आहे , नशिबाचा खेळ आहे मी प्रेमाचे फळ हे ही कथा वाचून तुम्हीच ठरवा .

 

 

 

 

 

 

 

 

नुकताच पाऊस येऊन गेला होता .समोरच्या पिंपळाच्या झाडाच्या पानांत साचलेल पाणी थेँबे थेँबे ठिबकत होत .वातावरणात चांगलाच गारवा पसरला होता .आभाळ मेघांनी गच्च दाटल होत .आठ वाजून गेले होते तरी आकाशात सूर्याचा लवलेशही नव्हता .ढगांमुळे चांगलीच अंधारी दाटून आली होती .

अस पावसाळी वातवरण पाहील ना की मनाच्या एका कोपऱ्यात दडून बसलेल्या सुप्त आठवणी नुकत्याच कोषातून बाहेर पडलेल्या फूलपाखराप्रमाणे स्वैर धरू लागतात .लहानपणी दोन महिन्यांच्या सुट्टी नंतर असच एका सकाळीच सकाळी आई लवकर उठावायची मग आळस देत शाळेची तयारी व्हायची .कोरा करकरीत रेनकोट अंगावरुन चढवून अशाच रिमझिम पावसातून चिखल तुडवत शाळेत यायच .फार दिवसांनी उघडल्याने कुंद हवेने भरलेले वर्ग , शाळेच्या मागच्या तलावावरून येणारा थंड वारा ,नवीन वह्या पुस्तकांतून दरवळणारा कागदी सुगंध पण खर सांगायच तर इतक्या उत्साही वातावरणातही थोडा फार कंटाळा यायचाच तो इतक्या सुट्टीनंतर पुन्हा शाळेत जायचा .

आजही मी लवकर उठलो होतो अगदी तशीच सकाळ , तेच वातावरण पण आज मला अजिबात कंटाळा आला नव्हता कारण आज माझा शाळेचा नाही तर कॉलेजचा पहिला दिवस होता .

मी अभिमान ....अभिमान देशमुख . मी मूळचा नाशिकचा सध्या इंजीनियरिंग करण्याच्या निमित्ताने पुण्याला आलो .आता साहजिकच तुमच्या मनात आल असेल मी इंजीनियरिंग करतोय म्हणजे चार वर्षाची डिग्री , मग एखाद्या चांगल्या कंपनीत प्लेसमेंट , पाच ते सहा लाखांच पॅकेज अशी काहीशी माझी स्वप्न असतील .पण असा गैरसमज मुळीच करून घेऊ नका कारण नोकरी वैगरे करायची गरज मला अजिबात .

आता राहिला प्रश्न माझ्या इंजीनियरिंगला अॅडमिशनचा तर याच सर्व श्रेय माझ्या आदरणीय वडिलांना जात .

आपल्या मुलाला इंजीनियरिंगला अॅडमिशन घेताना साधारण पालकांच्या भूमिका अशा असतात की जर आपला मुलगा इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंमध्ये आवड दाखवत असेल तर त्याला इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंगला पाठवायच , जर मशीनची तोड़फोड करत असेल तर मेकॅनिकल आणि कंम्प्युटरवर वेळ घालवत असेल तर कंप्यूटरला पाठवायच .काही जण तर फार अभिमानाने सांगतात

" आमचा बंटी ना दिवसभर कॉम्प्युटर समोर बसलेला असतो बघा .म्हणूनच ठरवल आता याला कॉम्प्युटरलाच पाठवायच "

आता यांचा मुलगा तासनतास कंप्यूटरसमोर राहून काय करतो हा ही एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे .माझ मेकॅनिकलला येण्याच कारण अगदी जगावेगळ होत .माझे वडील ' सूर्यकांत देशमुख ' हे नाशिकमधले प्रसिद्ध बिजनेसमॅन .माझ्या वडिलांचा बिजनेस पुढे वाढवण्याची माझी इच्छा होती , नोकरी मला कधी करायचीच नव्हती . त्यांनाही माझा हा निर्णय मान्य होता पण तरीही माझ्या वडिलांनी फक्त ग्रॅज्यूएशन करून शिक्षण पूर्ण करण्यापेक्षा मला इंजिनियरिंग करायला सांगितली. याला कारण फक्त एकच होत. त्यांना इंजिनियरिंग करायची इच्छा होती पण त्यांच्या वडिलांनी ती पूर्ण होऊ दिली नाही म्हणून ती इच्छा पूर्ण करायची जवाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली होती. मी ही ती झटकन स्वीकारली कारण कितीही झाल तरी मी त्यांचा लाडका मुलगा होतो .आता लाडका असायला मी काही फार मोठा पराक्रम वैगरे गाजवला नव्हता .पप्पांनी उठ म्हटल की उठायच आणि बस म्हटल की बसायच .एकंदरीत काय त्यांची कोणतीही आज्ञा कोणताही प्रश्न न करता सरळ मान्य करायची .त्यामुळे आम्हा दोन भावंडात मीच पप्पांचा लाडका होतो .दोन भावंड म्हणजे मी आणि माझा दादा अविनाश .दादा म्हणजे एक वेगळच मटेरियल होता .लहान असताना पप्पांनी फुटबॉल आणला की हा बास्केटबॉल मागायचा .मोठ झाल्यावर शिमलामधे पिकनिकचा प्लॅन केल्यावर हा गोव्याला जायचा हट्ट करायचा .त्यालाही इंजिनियरिंगला पाठवायची पप्पांची इच्छा होती पण हट्टाने त्याने वाईल्ड लाईफ फोटोग्राफी चॉईस केलं .मला खरच कधी कधी त्याचा अभिमान वाटायचा पप्पांची एखादी गोष्ट नाही पटली तर ती उघड उघड बोलण्याची वेळप्रसंगी भांडण्याची त्याची तयारी असायची .पण माझ्यात तशी हिम्मत कधीच नव्हती .मी केवळ पप्पांना आवडतात म्हणून कित्येक मनाला न पटणाऱ्या गोष्टी आजपर्यंत केल्या होत्या .दादा मला या मुळे ' पप्पांचा चमचा 'म्हणायचा.

तुम्हाला अस वाटत असेल ज्याप्रमाणे श्री राम वडिलांच्या अाज्ञेखातर राज्यत्याग करून वनवास गमनासाठी निघाले होते . तसच अभिमान देशमुख केवळ सूर्यकांत देशमुखांच्या इच्छेखातर इंजिनीअरिंग घ्यायला तयार झाला असेल तर असा गैरसमज बिल्कुल करून घेऊ नका .खरतर मलाच घरापासून लांब कॉलेज हव होत .मलाही दादासारख बिनधास्त आयुष्य जगायच होत त्याच त्या बोरिंग आयुष्याचा खरंच कंटाळा आला होता .दोन वर्ष ज्युनीयर कॉलेजला गेली पण या दोन वर्षात मी एकदाही बंक नाही मारली .का तर पप्पांना कळेल याची भीती , गिटारिस्ट बनायच स्वप्न विसरून गेलो का तर पप्पांना आवडत नाही, पप्पांनी सांगितलं म्हणून आठवीनंतर फूटबॉलला हातही नाही लावला. पण आता मला माझ्या मर्जींने जीवन जगण्याची इच्छा होती. ती प्रत्येक गोष्ट करायची होती जी माझ्या मनाला योग्य वाटेल त्यातून मला आनंद मिळेल .पप्पांनी मला कॉलेजपासून जवळच आमच्या एका नातेवाईकाच्या बंगल्यात राहायचा सांगितलं होतं पण मीच नाही म्हणालो .कोणत्या नातेवाईकाच्या घरात राहायला गेल्यावर त्यांचे नियम पाळावे लागणार ,माझी प्रत्येक गोष्ट मम्मी पप्पांना कळणार .मला जो फ्रीडम हवा आहे तो तिथे कधीच मिळणार नव्हता म्हणून मीच हॉस्टेल वर राहायचा निर्णय घेतला .मम्मीने सुरुवातीला विरोध केला होता की, " इतका लाडात वाढलेला मुलगा होस्टेलला कसा राहणार वैगरे ?" पण पप्पांनी " अग जरा बाहेरच जग कळू दे त्याला अजून किती दिवस त्याचे लाड करणार आहेस ? " बोलून तिला गप्प केल .तिला पप्पांचा स्वभाव माहीत होता म्हणून ती ही जास्त काही बोलली नाही .मी इकडे येताना ती थोडी दुःखी झाली होती .पण मी मात्र फार खुश होतो .

टपरीवरच्या चहाची काचेवर जमा झालेली वाफ मी शर्टाने पुसून डोळ्यांवर चश्मा चढवला .समोर माझ कॉलेज दिसत होत .प्रशस्त लोखंडी गेटमधून मी आत आलो .सहा मजली कॉलेजची इमारत चांगली लांबच लांब पसरली होती .इथे इंजिनियरिंग बरोबर डिग्री ,डी एड़ आणि लॉ ही होत .ग्राउंडवर मुल क्रिकेट , फूटबॉल खेळत होती .त्यांना फुटबॉल खेळताना पाहून आठवीला सोडलेला फुटबॉल पुन्हा सुरू करण्याची फार इच्छा होत होती .पण तूर्तास हा विचार बाजूला ठेवून मी बिल्डिंगमधे एंट्री घेतली .इतक्या मोठ्या बिल्डिंगमधे लवकरात लवकर मला माझा बॅच नंबर शोधायचा होता कारण लेक्चर दहा वाजता सुरू होणार होते आणि माझ्या घड्याळात दहा वीस झाले होते .प्रत्येक नोटिस बोर्डवर लावलेल्या लिस्टमधे मी माझ नाव शोधत पुढे चाललो होतो इतक्यात माझ्या पाठीवर थाप पडली .

" फ्रेशर ??" मागून आवाज आला .

मी मागे वळून पाहील .मागे ढोपरावर फाटलेली जीन्स , ब्लेडने कापून डिझाइन बनवलेले टीशर्ट , गळ्यात लॉकेट , कानात बाळी , केसांना कलर अशा अवतारातली शुद्ध मराठीत सांगायच झाल तर उड़नटप्पु दिसणारी चार मूल उभी होती .त्यातल्या एकाने मला विचारल होत .मी ही होकारार्थी मान डोलावली .

" नाव काय आहे ?" दुसऱ्याने विचारल .

" अभिमान देशमुख ." मी म्हणालो .

" क्लास शोधतोयस ??" पहिल्याने विचारल .

" हो ." मी म्हणालो .

" कोणती स्ट्रिम ??"

" मेकॅनिकल "

"ओहह इंजिनियरिंग ?"

"येस " मी म्हणालो .

" ए रॉकी याच नाव चेक कर लिस्टमध्ये बघ कोणत्या क्लासमध्ये आहे ."

" हा जी २७ मधे आहे " तिसर्या मुलाने सांगितल .

" अरे लेक्चर केव्हाच सुरू झाला तुझा लवकर जा या फ्लोअरवर शेवटचा क्लास " त्या मुलाने सांगितलं .पण हे सांगताना त्या मुलाच्या ओठांवर एक मिश्किल हसू होत . काहीतरी गडबड आहे असा मला संशय येत होता पण आता उशीर झाला म्हणून मी जास्त विचार न करता शेवटच्या क्लासरूमकडे धावत पळत आलो आणि आत घुसलो .

आत दोन मुली आरशासमोर उभ राहून केस विंचरत होत्या , एक लिपस्टीक लावत होती , एक लेडीज शिपाई लादी पुसत होती , एक मुलगी मला पाहून जोरात किंचाळली आणि समोरच्या टॉयलेटमध्ये जाऊन दरवाजा बंद केला .त्या मुलांनी मला सबशेल उल्लू बनवल होतं .मी गर्ल्स वॉशरूममध्ये आलो होतो आणि एखाद्या बंगल्यामधल्या श्रीमंत लोकांच्या पार्टीत कोणा भिकाऱ्याने भुकेच्या आशेने प्रवेश करावा आणि नंतर त्या भिकाऱ्याकडे लोकांनी ज्या नजरेने पाहावं अशा काहीश्या नजरेने त्या मुली माझ्याकडे पाहत होत्या .त्या मला काही बोलायच्या आत मी विजेच्या वेगाने त्या रूममधून बाहेर आलो .

" देवाने दिलेत ना दोन डोळे .बघून येता येत नाय का आत " त्या रूममधून आवाज येत होता कदाचित त्या लेडी शिपाईचा असेल .

समोर ती मघासची चार मुलं उभी होती ज्यांनी मला फसवलं होतं .ते माझ्यावरच हसत होते त्यांना पाहून मला फार राग आला .त्यातलाच एक माझ्या जवळ चालत आला .

" सॉरी मित्रा .थोडी मस्करी केली .फर्स्टफ्लोअरवर तिसरा क्लास आहे तुझा " त्याने सांगितल .

त्यांच्याशी भांडत बसायला माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता .मी दुर्लक्ष करून फर्स्टफ्लोअरवरच्या तिसऱ्या क्लासरूमध्ये आलो .आत कोणीही प्रोफेसर माझ्या नजरेस पडत नव्हता .कदाचित पहिला दिवस असेल म्हणून लेक्चरला कोणी प्रोफ़ेसर आला नसेल .क्लासमध्ये ऐकून पाच रो होते दोन मुलींचे आणि तीन मुलांचे. मुलींच्या रो मध्ये प्रत्येक बेंचवर मुली बसल्या होत्या .पण मुलांच्या रो मध्ये सगळी मुल अगदी नेहमीच्या सवयीप्रमाणे पहिले दोन बेंच सोडूनच बसले होते .चौथ्या रो मध्ये फक्त पहिल्या बेंचवर एक गोरागोमटा , कुरळ्या केसांचा , गोबऱ्या गालाचा , डोळ्यांवर भलामोठा चश्मा लावलेला एक मुलगा बसला होता .प्रत्येक शाळेत , कॉलेजमध्ये असा एक तरी प्राणी असतोच जो भूकंप येऊ देत अथवा त्सुनामी काहीही झाल तरी लेक्चर अटेंड करणारच आणि येऊन पहिल्या बेंचवरच बसणार मग भलेही समोरचा कोणी म्हातारा प्रोफ़ेसर बोलताना त्याच्या तोंडातील दवबिंदु त्याच्या अंगावर उडाले तरी त्याला चालतात .अर्थात मी ही ज्युनीयर कॉलेजला असताना असाच होतो पण आता मला तस अति सभ्य आयुष्य जगायची अजिबात इच्छा नव्हती .मी मुद्दाम तिसऱ्या रोच्या चौथ्या बेंचवर येऊन बसलो .माझ्या बाजूला बसलेल्या मुलाने मला एक स्माईल दिली आणि मागच्या मुलांशी बोलू लागला .तो त्या दोघांना फॉर्म भरायला मदत करत होता . पुढच्या बेंचवर बसलेला मुलगा एफ.एम. ऐकत होता . मी घड्याळात पाहील दहा पंचवीस झाले होते .प्रोफ़ेसरचा अजून काही पत्ता नव्हता .मी आजुबाजुला पाहील काही मुल फॉर्म भरत होती , काही एकमेकांशी ओळख करून घेत होती , माझ्या उजवीकडे मुलींचा रो होता , तिथे मुली घोळका करून बसल्या होत्या त्यांचे हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते , माझ लक्ष सहज माझ्या बाजूच्या बेंचवर बसलेल्या मुलीकडे गेल .का कुणास ठावूक पण तिला बघताच मला अस जाणवलं ही मुलगी बाकीच्या मुलींपेक्षा वेगळी आहे .पूर्ण क्लासमधल्या सगळ्या मुली टाईमपास करत होत्या पण ती एकटीच अशी मुलगी होती जी कोणत तरी पुस्तक वाचत होती .मला आधीपासून मेकअप ब्युटीजपेक्षा अशा साध्या सरळ , अभ्यासू मुलीच फार आवडायच्या .पण माझ नशीबच फुटक माझ्या कॉलेजमधे ज्या मुली होत्या त्या माझ्याकडेच नोटस मागायच्या आणि ज्या एक दोन अभ्यास करणाऱ्या होत्या त्या दिसायला इतक्या चांगल्या नव्हत्या .पण आता माझ्या बाजूला बसलेली मुलगी दिसायलाही फार सुंदर होती .मी अजून तिचा चेहरा बघितला नव्हता पण माझा सिक्स्थ सेन्स मला तस सांगत होता .मी तिच्या डाव्या बाजूला बसलो होतो आणि त्याच बाजूने तिचे केस तिच्या चेहऱ्यावर रूळत होते ,केसांमधून दिसणारी तिची गोरीपान मान , गुलाबी सलवार कमीज , जमिनीवर काढलेल्या ओल्या सँडलशी चाळे करणारी पावले , किनकिनाऱ्या चंदेरी बांगड्या घातलेले नाजुक हाथ एवढ पाहून मला एक गोष्ट चांगलीच समजली होती की ही मुलगी फार सुंदर असणार . माझ्याकडे कोणाच लक्ष नाही याचा अंदाज घेऊन मी पुन्हा तिच्या केसांमधून तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करू लागलो .आयुष्यात पहिल्यांदा कोणा मुलीकडे मी अशा तऱ्हेने पाहत होतो . कदाचित वयानुसार वाढणार आकर्षण असेल किंवा आतापर्यंत पाहिलेली ती सर्वात सुंदर मुलगी असेल किंवा अजून काही कारण असेल पण तिला पाहत राहावंस वाटत होत .तिला पाहण्याची माझी ही तळमळ कदाचित देवालाही जाणीवली असेल त्याने माझी मदत केली .त्या मुलीने फिक्कट मेहंदीने सजलेल्या तिच्या नाजुक बोटांनी चेहऱ्यावर आलेले केस हलकेच कानामागे सारले . मी तिला पाहिलं रुंद कपाळ , कोरीव भुवया , पाणीदार डोळे , रेखीव नाक , गुलाबी ओठ , गोबरेगाल पाहून माझ्या ओठांवर आपोआप स्माईल आली .तिच्या हातात असलेल्या पुस्तकात तिने काही वाचलं आणि खुदकन हसली .हसण्यामुळे तिच्या गालावर उमटलेली खळी पाहून मी त्या पुस्तकाच्या लेखकाचे मनोमन आभार मानले .मी अगदी एकटक तिच्याकडे पाहत होतो . तिला हे जाणवलं असाव तिने माझ्याकडे पाहील आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या .मी लगेच माझी नजर फिरवली आणि दूसरीकडे पाहू लागलो .माझ्या काळजाचा चुकलेला ठोका स्पष्टपणे मला जाणवत होता .मी पुन्हा चोरून

1 2 3 4 5 6 7 8 9 10
Go to page:

Free e-book «कदाचित हेच आहे प्रेम - अभिषेक दळवी (best e reader for manga txt) 📗» - read online now

Comments (0)

There are no comments yet. You can be the first!
Add a comment