कदाचित हेच आहे प्रेम - अभिषेक दळवी (best e reader for manga txt) 📗
- Author: अभिषेक दळवी
Book online «कदाचित हेच आहे प्रेम - अभिषेक दळवी (best e reader for manga txt) 📗». Author अभिषेक दळवी
रूमवर आल्यावरही माझ्या मनात तेच विचार चालू होते .मी नाशिकवरून येताना ठरवून आलो होतो पण आता थोड भरकटलो होतो .रात्री झोपताना मी मनाशी पक्क केल स्मितापासून आता लांबच रहायचं .आजही सकाळी उठून पहिल्या लेक्चरला येऊन बसलो पण काल जसा उत्साह वाटत होता तसा आज अजिबात वाटत नव्हता .नेहमी सारखच सगळं चालू होतं .ब्रेकनंतरचा दुसरा लेक्चर चालू होता जसा लेक्चर संपला विकी त्याची बॅग घेऊन बाहेर जायला निघाला आणि मलाही बोलवू लागला .मी यायला नकार दिला पण त्याने माझ काही ऐकल नाही माझी बॅग घेऊन तो बाहेर पळाला .माझी बॅग नसताना मी लेक्चरही अटेंड करू शकत नव्हतो म्हणून मी लेक्चर बंक करून त्याचा पाठलाग करत थर्डफ्लोअरवर लायब्ररीजवळ आलो .तो लायब्ररीजवळ जाऊन उभा राहिला .माझी तिथे जायची इच्छा नव्हती मी पायऱ्यांवरच बसून राहिलो .मागून बी एस्सीच्या मुलांमुलीचा आवाज येऊ लागला .कदाचित नुकतेच त्यांचे लेक्चर संपले असावेत .माझी फार इच्छा होत होती मागे वळून स्मिता कुठे दिसतेय का ते पाहायची .पण मी स्वतःला थांबवल ती दिसली असती तर पुन्हा तिच्याशी जाऊन बोलावस वाटल असत तेच मला नको होत .
काही वेळाने परांजपे सर माझ्या बाजूने पायऱ्यांनी वर गेले त्यांना पाहून मी लगेच तोंड लपवल .त्यांनी मला पाहिलं असत तर उगाच ओरडा भेटला असता ते जसे वर गेले तसा विकी माझ्याकडे धावत आला .
" अभी ....अभी ....अभी ...."
" काय झाल ...का अस ओरडतो आहेस ?" मी विचारलं.
" तुझ्याकडे आता मॅत्थसची ट्युटोरियल बुक आहे का ?" म्हणत तो माझ्या बॅगेत ट्युटोरियल बुक शोधू लागला .
" हो आहे ती बघ ." म्हणत मीच त्याला बॅगेतून ती बुक काढून दिली .
" चल माझ्याबरोबर मला परांजपे सरांना डाउटस विचारायचेत ." विकी म्हणाला .
" काय ??
अरे ती ट्युटोरीयल तू लिहायला अजून स्टार्ट केली नाहीस मग डाऊटस आले कुठून ?? आणि तुला डाऊटस असतीलच तर मला सांग मी सॉल्व करतो माझी ट्युटोरीअल कंप्लीट आहे ." मी म्हणालो .
" माझ सरांकडे काम आहे तुला डाउट विचारून काय करू ? तू जास्त शहाणपणा करू नकोस चल गपचुप माझ्याबरोबर ." बोलून तो मला घेऊन स्टाफरूमजवळ आला .
स्टाफरूमच्या दरवाजातल्या काचेतून आतमधे परांजपे सर बसलेले दिसत होते ते आमच्या सोबत बी एस्सीलाही मॅत्थस शिकवायचे .कदाचित आता संपलेला बी एस्सीचा शेवटचा लेक्चर त्यांचाच होता .विकी थोडा पुढे जाऊन आतमध्ये कोण कोण आहे ते पाहून आला .
" ऐक .आतमधे जास्त टीचर्स नाहीत आणि परांजपे सरांचा मोबाईल चार्जिंगला आहे .मी आतमध्ये जाऊन सरांना डाउट विचारीन .तू इथेच थांब मी इशारा केल्यावर सरांना कॉल कर ."
" पण का ?"
" ते मी तुला नंतर सांगतो ." बोलून तो स्टाफरूममधे गेला आणि माझी बुक उघडून सरांना काहीतरी विचारू लागला .माझ त्याच्याकडेच लक्ष होत त्याच सरांशी बोलण चालू असताना मला हाताने त्याने फोन करण्याचा इशारा केला .मी सरांना फोन लावला सर उठून त्यांच्या चार्जिंगला असलेल्या फोनजवळ गेले .
सर कॉल अटेंड करायला गेल्यावर विकी टेबलावरच्या त्यांच्या फाईल्स उघडून पाहू लागला .दोन तीन फाईल्स पाहून झाल्यावर एका फाईलमधे त्याला काही तरी सापडलं तो लगेच माझी ट्युटोरीयल बुक घेऊन बाहेर आला .
" चल इथून "
" तू डाउटस विचारनार होतास ना ?" मी विचारल .
" डाउटस गेले तेल लावत .आपल काम झाल चल आता ." बोलून मला खेचतच कँटीनमधे घेऊन आला .
" विकी तुझी ही फालतूगिरी का चाललीय ते सांग आधी ." मी शेवटी विचारलच .
" सांगतो ऐक .जी मुलगी मला आवडते तीच नाव मला माहीत करून घ्यायचय . तिने आता थोड्यावेळापूर्वीच परांजपे सरांना असाइंटमेंट दिली होती मी पाहिलं होत .असाईंटमेंटवरच तीच नाव पाहायला मी हे सर्व करत होतो ."
" मग काय आहे तीच नाव ?" मी विचारलं.
" नाही कळल ना .असाईंटमेंटवर तिने स्वतःचा फक्त रोलनंबर लिहला होता ." विकीने उत्तर दिल .
त्याच उत्तर ऐकून मी जोरजोरात हसू लागलो .त्याने बिचाऱ्याने इतकी मेहनत करून डोंगर पोखरला पण निघाला मात्र उंदीर .पण विकी शांत बसणारा नव्हता दिवसभर तो तीच नाव कस माहीत करायच याचाच विचार करत होता .रात्री मेसमधून आल्यावर आम्ही जरा लवकरच झोपलो .
रात्री मी गाढ झोपेत असताना विकीने मला जोर जोरात हलवून उठवलं .मी घड्याळात पाहील तर एक वाजायला पंधरा मिनिटं बाकी होती .
" काय झाल ? उठवलस कशाला ?" मी डोळे चोळत विचारलं .
" आपला सी आर ऑफ लेक्चरची अटेंडन्सशीट क्लासमधल्याच ड्रॉवरमधे ठेवतो ना रे ?"
" हो .म्हणून तर आपण अपसेंट राहूनसुद्धा अटेंडन्स लावू शकतो ना ." मी आळस देत उत्तर दिल .
" बी एस्सीच्या क्लासमधेही तसेच ड्रॉवर्स आहेत मग त्यांचे सी आर त्यांच्या अटेंडन्सशीट तिथेच ठेवत असतील ना ? " विकीने विचारल.
" हो .ठेवत असतिल कदाचित " मी म्हणालो .
" चल माझ्याबरोबर " बोलून तो उठून उभा राहिला .
" कुठे ?"
" बी एस्सीच्या क्लासमध्ये "
" पण का ?"
" तिचा रोल नंबर मला माहीत आहे अटेंडन्सशीटवरून तीच नाव कळेल आपल्याला ." विकी म्हणाला .
" तू दारू घेतली आहेस का थोडीशी ?
वाजले बघ किती .झोप गपचुप ." बोलून मी बेडवर आडवा झालो .
" अरे चल ना यार "
" उद्या कॉलेजमधे लेक्चर संपल्यावर बी एस्सीच्या क्लासमधे जाऊया आता नको "
" लेक्चर संपल्यावर क्लासला लॉक लावतात आणि उद्या दसरा आहे त्या मुळे सुट्टी आहे विसरलास का ?"
" मग काय करूया ?"
" आताच जाऊन चेक करूया त्यांची अटेंडन्सशीट ." विकी पुन्हा म्हणाला .
" पण क्लासला लॉक लावतात ना मग आत कस घुसणार ?" मी विचारलं .
" विंडोतून घुसायच .ग्राउंड फ्लोरवरच्या सगळ्या क्लासच्या विंडोज तुटलेल्या आहेत आणि सेकेंड यीअर बी एस्सीचा क्लास्स ही ग्राउंडफ्लोर वरतीच आहे ."
" पण ती मूल आज थर्डफ्लोरच्या कोणत्यातरी क्लासरूममधे बसली होती ना ?" मी विचारल .
" त्यांचे आज एक्स्ट्रालेक्चर होते म्हणून तिथे बसले होते .
तू जास्त प्रश्न विचारत बसू नकोस चल लवकर ." बोलून त्याने एक टॉर्च स्वतःला घेतली आणि दूसरी मला दिली .
आम्ही हॉस्टेलच्या मागच्या गेटने बाहेर येऊन कॉलेजकडे निघालो .नुकताच पाऊस येऊन गेला होता त्यामुळे थंड वारा जाणवत होता .आजुबाजुचा सगळा परिसर शांत होता .आम्हा दोघांशिवाय आसपास दुसर कोणीही नव्हत .दिड वर्षापूर्वी जेव्हा मी इथे अॅडमिशन घेतल होत तेव्हा एक गोष्ट ठरवली होती की भित्रेपणा सोडून द्यायचा .दादासारख बिनधास्त आयुष्य जगायच .दीड वर्षापूर्वीचा अभिमान आणि अाताचा अभिमान यात फार फरक होता .नाशिकला असताना रात्री बारानंतर मी कधी घराबाहेर पाऊल टाकलं नव्हत .घरासमोर कोणते कुत्र जरी भुंकायला लागल तरी मी खिडकीतून त्याला हाकलवायचो पण घराबाहेर यायचो नाही आणि आता रात्री एक वाजता या सुनसान जागेतून येऊन मी चोरासारख कॉलेजमधे घुसत होतो आणि तेही फक्त एका मुलीच नाव माहिती करून घ्यायला .खरच आयुष्यात असे बदल घड़ायला विकीसारखे मित्र असावे लागतात .
आम्ही कॉलेजच्या कंपाउंड वॉलपर्यंत पोहोचलो .
" विकी वॉचमननी पकडल तर वाट लागेल यार ." मी म्हणालो .
" हिटलरला बाथरूममध्ये बंद केल होत तेव्हा नाही घाबरलास आता का घाबरतो आहेस ? तेव्हा तर कॉलेजमधे दोन वॉचमन होते .आता एकच असतो तो पण कधी तरी असतो ." बोलून विकीने कंपाउंड वॉलवरून आत उडी घेतली त्या पाठोपाठ मी ही आत आलो .
आम्ही तसेही कॉलेजच्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला होतो त्यामुळे वॉचमनच्या नजरेत येण्याचा धोका नव्हता .टॉर्चच्या प्रकाशात तो मला बी एस्सीच्या क्लासच्या विंडोपर्यंत घेऊन आला .
" विकी तुला नक्की माहीत आहे ना ती असाईंटमेंट तिचीच होती .तो रोल नंबर दुसराच कोणाचा असेल तर सगळी मेहनत वाया जाईल ."
" हो रे .तिचीच असाईंटमेंट होती ती . लायब्ररीत फक्त तीच होती आणि तिनेच असाईंटमेंट सबमिट केली होती .तू इथेच थांब मी आत जातो ." बोलून विकी त्या तुटलेल्या विंडोतून आत गेला .मला वाटल होत त्याला बाहेर यायला वेळ लागेल पण फक्त दहा मिनिटातच तो बाहेर आला .
" थँक गॉड .नाव कळाल तिचं " तो खुशीत बोलून गेला .
" काय नाव आहे ?" मी विचारल .
" आता नको ती जेव्हा मला हो म्हणेल तेव्हाच तुला सांगेन ."
त्याच उत्तर ऐकून मला फार राग आला होता .मी त्याची इतकी मदत केली आणि तो मला त्या मुलीच साध नाव सांगत नव्हता पण ही वेळ भांडणाची नव्हती . आम्ही तिथून होस्टेलवर परत आलो त्या नंतर मी त्याला अनेकदा तिच्याबद्दल विचारल पण त्या नालायकाने तीच नाव सांगितल नाही .
या नंतर दोन महीने उलटून गेले आमची थर्ड सेमिस्टरही संपली .सध्या फुटबॉलवर आम्ही पूर्णपणे फोकस करत होतो .नेहमी संध्याकाळी सात वाजेपर्यंत आमची कॉलेज ग्राउंडवर प्रॅक्टीस चालायची .पण विकी गेले पाच सहा दिवस अर्धा पाउणतास आधीच काही ना काही तरी कारण देऊन निघून जायचा .मला शंका आली की त्या मुलीसाठीच हा जात असणार .म्हणून मी त्याच्यावर एकदा लक्ष ठेवलं तेव्हा तो ग्राउंडवरून निघून सरळ हॉस्टेलमध्ये आला .मला फार आश्चर्य वाटल हा प्रॅक्टीस सोडून हॉस्टेलवर येईलच कशाला ? नक्कीच काहीतरी गडबड आहे .
विकी हॉस्टेलमध्ये गेल्यावर मी ही आमच्या रूममध्ये आलो .आत पाहिलं तर कोपऱ्यात विकीची बॅग पडलेली दिसत होती पण तो रूममध्ये नव्हता .
" विकी इथेच आला होता ना रे मग गेला कुठे ?" मी देवला विचारल .तो बेडवरच अभ्यास करत बसला होता .
" तो टेरेसवर गेलाय ." त्याने सांगितल .
" टेरेसवर कशाला ?"
" काही माहीत नाही .नेहमी याच टाईमला रूमवर येऊन तो टेरेसवर जातो ."
मी तिथून सरळ टेरेसवर आलो .समोरच टेरेसच्या पॅरापिडवॉलजवळ विकी उभा होता .त्याच्या पासून थोडं दूर आणखी दोन तीन मूलही उभे होते ते तिथे उभे राहून काही तरी पाहत होते .मी विकीच्या जवळ आलो आणि विकी पाहत होता तिथे पाहिलं .हॉस्टेलच्या मागे दोन मजली बंगला दिसत होता त्या बंगल्याच्या टेरेसवर काही मुली होत्या .तो बंगला हॉस्टेलच्या बिल्डिंगच्या डाव्या बाजूला म्हणजे माझ्या रूमच्या बरोबर मागे होता .कधी कधी मला तिथून मुलींच्या हसण्या खिदळण्याचा आवाज यायचा मी कित्येकवेळा आमच्या रूमच्या खिडकीतून तो बंगला बघायचा प्रयत्न करायचो पण हॉस्टेलच्या कंपाउंड वॉलमुळे स्पष्ट काही दिसायचं नाही . हॉस्टेल आणि बंगल्यामध्ये एक मोठ पिंपळाच झाड होत .बंगल्याच्या बाल्कनी आणि टेरेसवर शेड होती म्हणून टेरेसवरून पाहून सुद्धा तिथे कोण राहत हे आम्हाला माहीत नव्हतं .पिंपळाच्या झाडाच्या जास्त वाढलेल्या फांद्या नुकत्याच कापल्या होत्या .टेरेसवरून बंगला आणि आजुबाजूच अंगन स्पष्ट दिसत होत .विकीच लक्ष अजूनही त्या मुलींवरच होत ते पाहून त्याला एक जोराची टपली मारल्याशिवाय मला राहावल नाही .
" तू या साठी फुटबॉल प्रॅक्टीस सोडतोस ?" मी जरा रागातच विचारल .
" बरखुददार इसके लिए तो हम पूरी दुनिया छोड़ सकते है। फुटबॉल तो बहुत मामूली चीज़ है।" त्याने त्याच्या फिल्मी स्टाईलमधे सांगितल .
" आणि त्या मुलीच काय झाल जिच नाव शोधायला आपण मध्यरात्री कॉलेजमधे गेलो होतो ?"
" अरे वेड्या, तिलाच पाहायला तर मी इथे येतो ती याच बंगल्यात राहतो .ती बघ ." बोलून त्याने टेरेसकडे बोट दाखवलं .
टेरेसवर आता फक्त दोन मुली दिसत होत्या बाकीच्या आत गेल्या होत्या .
" त्या दोघींपैकी कोणती ? "
" त्यां दोघींपैकी नाही .कदाचित आत गेली वाटत ."
" कशी होती दिसायला ?"
" गोरी आहे .तू आता पाहिल असशील सफेद होती " तो बोलला इतक्यात त्याच्या फोनची रिंग वाजु लागली .
" आदित्यचा कॉल आहे .थांबमी पाहून येतो " बोलून तो निघून गेला .
बंगल्याच्या टेरेसवर उभ्या असलेल्या त्या दोन मुलीही निघून गेल्या तिथे आता कोणीही नव्हत त्या मुळे त्यांना पाहायला आलेली माझ्या आसपासची मूलही निघून गेली .टेरेसवर आता मी एकटाच होतो हिवाळाजवळ आला होता .सूर्य मावळत चालला होता मस्त थंड वारा सुटला होता .काही वेळ थांबून मी यायला निघणार तितक्यात त्या बंगल्याच्या टेरेसवर एक मुलगी आली आणि पॅरापिडवॉलजवळ जाऊन उभी राहिली .तिची पाठ माझ्याकडे होती त्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता तिने स्लीवलेस सफेद गाऊन घातला होता , वाऱ्याबरोबर तिचे मोकळे केस भूरूभूर उडत होते , तिने आपल्या हातांची बोट तिच्या गोऱ्यापान दंडात घट्ट रुतविली होती तिला थंडी जाणवत असावी .पण तरीही ती तो थंड वारा अंगावर घेत उभी होती .तिचा चेहरा पाहण्याची माझी फार ईश्चा होती .विकी मगाशी बोलला होता त्याला आवडणारी मुलगी याच बंगल्यात राहते आणि तिने सफेद गाऊन घातला आहे कदाचित ती हीच असावी .
" साल्याची चॉइस जबरदस्त आहे " मी स्वतःशीच पूटपुटलो .
तितक्यात ती मुलगी परत जायला वळली .मी तिचा चेहरा पाहिला .तिचा चेहरा पाहून मला ४४० वोल्टचा झटका बसला कारण ती मुलगी दूसरी तिसरी कोणी नसून स्मिता होती .
आपण ही कथा आतापर्यंत जास्तीच जास्त पाहिलीच असेल आणि आशा आहे आपल्याला ही आवडली असेल . या कथेत पुढे काय होत हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला संपूर्ण कथा वाचावी लागेल .पूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा amazon kindle वेबसाईटवर जाऊन कदाचित हेच आहे प्रेम किंवा abhishek dalvi टाईप करून पूर्ण पुस्तक प्राप्त करा
https://www.amazon.com/%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-Marathi-ebook/dp/B07H2M7J36/ref=sr_1_5?keywords=abhishek+dalvi&qid=1585728243&s=digital-text&sr=1-5
Imprint
Comments (0)