कदाचित हेच आहे प्रेम - अभिषेक दळवी (best e reader for manga txt) 📗
- Author: अभिषेक दळवी
Book online «कदाचित हेच आहे प्रेम - अभिषेक दळवी (best e reader for manga txt) 📗». Author अभिषेक दळवी
आम्ही मात्र असेच अधूनमधून बाहेर जायचो .रतनच शेतातल घर म्हणजे आमचा अड्डा होता .तिथे आम्हाला डिस्टर्ब करणार कोणीही नव्हत .दर रविवारी तिथे आमचा गावठी मटण , कलेजी फ्राय आणि भाकऱ्यांचा बेत ठरलेला असायचा .सोबतीला रम किंवा बीयर तर असायचीच .मी सोडून बाकी सर्वजण प्यायचे .मी अजून तरी या सर्वाला हात लावला नव्हता .इथे येण्यापूर्वी मम्मीने मला बजावलं होत,
" अभी, घरापासून दूर जातोयस मजा मस्ती कर पण नशा अजिबात करायची नाहीस ." मम्मीची ही आज्ञा मी मनापासून पाळली होती .
पण म्हणतात ना,
" कुत्रा मांजरीला त्रास दिल्याशिवाय आणि मित्र मित्राला बिघडवल्याशिवाय शांत बसत नाही ." हे ज्याने कोणी सांगितलंय ते योग्यच आहे .जसा रंभेने विश्वामित्रांचा तपोभंग केला होता तसाच माझ्या नालायक मित्रांनी माझा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला .
एकदा विकीचा बर्थडे होता त्या आदल्या रात्री बारा वाजता आम्ही सर्व रतनच्या घरात जमलो होतो .सेलीब्रेशन नंतर विशालने सगळ्यांकडे कोकची बॉटल पास केली .मी जेव्हा सिप घेतले तेव्हा त्याची टेस्ट मला त्याची वेगळी जाणवली पण मी त्या कडे दुर्लक्ष केल .नंतर मला थोड मळमळायला लागल म्हणून झोपायला गेलो .रात्री उशीरा कधी तरी मी एक नंबरला उठलो आणि अंधारातच बाहेर गेलो .नंतर नक्की काय झाल ते मला आठवत नाही पण सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मी जनावरांच्या तबेल्यात असलेल्या चाऱ्यामध्ये झोपलो होतो .आजुबाजूला पाहील तेव्हा लक्षात आल की आता मी रतनच्या शेताच्या बाजूला असलेल्या म्हशींच्या तबेल्यात आहे .माझ्या आजूबाजूला फक्त म्हशीच दिसत होत्या कदाचित रात्रभर मी इथेच होतो .रात्रीचा माझा संशय अगदी योग्य होता .कोकमध्ये या लोकांनी रम मिसळली होती .मी तिथून निघून रतनच्या घरी आलो जिथे आम्ही रात्री पार्टी केली होती .पण तिथे आता कोणीही नव्हत .घरासमोर आदित्य आणि विशालच्या बाईकही दिसत नव्हत्या .माझ्या मोबाईलची बॅटरी लो होऊन तो स्विचऑफ झाला होता .मला माझ्या या मित्रांचा खरच फार राग आला होता .तिथून रिक्षा पकडून मी होस्टेलवर आलो तर तिथल्याही आमच्या दोन्ही रूमला बाहेरुन कड़ी होती .देवही कुठेतरी बाहेर गेला होता .रविवारचा दिवस असताना हे कुठे गेलेत ते मला कळत नव्हत .एकतर मला रात्री फसवून रम प्यायला लावली आणि आता मला एकट सोडून कुठेतरी गेले होते .मला या सर्वाचा फार राग येत होता ते सगळे आल्यावर त्यांना चांगल सुनवायच ठरवून मी फ्रेश होऊन कॉलेजच्या ग्राउंडवर फूटबॉल खेळायला गेलो तिथून परत येईपर्यंत दुपारचे एक वाजले .मी रुममधे येऊन पाहिलं .रूममध्ये विकी , देव , आदित्य आणि विशाल कालच्याच कपड्यांमध्ये असा उदास चेहरा करून बसले होते जस काय दुसऱ्या महायुद्धात झालेला हिंसाचार आणि रक्तपात पाहून आलेत .मी आलोय हे पाहून विकी उठला आणि धावत येऊन मला झटकन मिठी मारली .
" बर झाल यार सापडलास .आम्ही किती घाबरलो होतो ." विकी म्हणाला .
तो अस का बोलतोय ते मला समजल नाही .
तितक्यात विशालने येऊन माझ्या डोक्यात टपली मारली .
" कुठे होतास ? आम्ही किती शोधल माहितीये तुला ? सापडला नसतास तर आम्ही पोलिसांकडे जाणार होतो ." विशाल म्हणाला .
"मला कशाला शोधलं होता ? नक्की काय झालय इतक पॅनिक व्हायला ? " मी विचारलं.
" सकाळपासून कुठे गायब झाल होतास ?
आम्हाला वाटल तू हॉस्टेलला आला आहेस म्हणून आम्ही इथे आलो. तू इथेही नव्हतास .तुझा मोबाईलही स्विच ऑफ येत होता .आम्ही पुन्हा रतनच्या गावी जाऊन अख्ख्या गावात तुला शोधलं .रतनच्या बाबांचा ओरडासुद्धा खाल्ला." आदित्य म्हणाला .
त्यांच्याकडून मला सकाळपासून आतापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी कळल्या .मी विनाकारण त्यांच्यावर रागावलो होतो ते बिचारे सकाळपासून माझीच काळजी करत होते .रात्री कोकमधे रम मिक्स करायची आयडीया विकीचीच होती आणि त्या मुळेच हे सर्व झाल होत .त्याचा बर्थ डे होता पण बिचाऱ्याचा पूर्ण दिवस सगळ्यांचा ओरडा खाण्यातच गेला होता .
विकी हल्ली थोडा फार विचित्र वागू लागला होता .सकाळी लवकर उठून पहिल्या लेक्चरच्या एक तास आधीच तो कॉलेजमध्ये जायचा , सुधीरसारख तो ही आमच्या नोटस घेऊन झेरॉक्स काढायला जायचा , लेक्चर बंक करायचा .म्हणजे तस मी ही लेक्चर बंक करायचो पण आमच्या ग्रुपने केलं तरच .त्याच अस बदललेल वागणं पाहून मला संशय यायला लागला होता म्हणून एकदा तो असाच आमच्या नोटस घेऊन झेरॉक्स काढायला निघाला होता तेव्हा मी ही लेक्चर बंक करून त्याच्या पाठोपाठ निघालो .आदित्य आणि विशाल आमची प्रॉक्सी लावायचे त्यामुळे लेक्चरच्या अटेंडन्सच तस टेंशन नव्हत .विकी थर्डफ्लोअरवरच्या परेशभाईंच्या स्टोरमध्ये आमच्या नोट्स झेरॉक्ससाठी देऊन तिथेच थांबला .पण त्याची नजरसारखी स्टोरच्या बाजूला असलेल्या लायब्ररीमधे जात होती .ती बी एस्सीची लायब्ररी होती आणि आतमध्ये मूल मुली बसले होते .मुलांपेक्षा मुली जास्त होत्या अर्थात कोणत्याही कॉलेजच्या लायब्ररीमधे मुलांपेक्षा मुलींचीच संख्या जास्त असते कारण मुलांना लायब्ररी फक्त परीक्षेच्या काही दिवस आधी आठवते .विकीच बदलेल्या वागण्याच कारण आता मला समजत होत इंजिनिअरिंगमधे मुलींची कमतरता होती म्हणून त्याने आपल लक्ष आता बीएस्सीकडे वळवल होत .मी त्याच्याजवळ गेलो .
" काय .....कोण आवडली ?" मी विचारलं.
मला समोर पाहून आणि माझ्या अशा प्रश्नाने तो थोडाफार दचकलाच .
" कोण ....कोण आवडली म्हणजे ?" त्याने विचारल .
" विकी बेटा बिल्ली आँखे बंद करके दूध पीती है , इसका मतलब यह नही की दुनिया को उसकी हरकतें नजर नही आती। तुम रोज यहाँ आकर लौंडिया देखते हो हमे पता है।" परेशभाई बोलले .ते आता दुकानातच बसले होते .
" चल आता सांगूनच टाक कोण आहे ती ??" मी विचारलं .
" मला नाव नाही माहीत तिचं " विकी म्हणाला .
" दादा बेचाळीस रुपये झाले ." झेरॉक्सच्या दुकानात काम करणारा बंटी म्हणाला.
" तुझ्याकडे सुट्टे पैसे आहेत ??" विकीने विचारल .
" नाहीत सुट्टे.
तू आता विषय बदलू नकोस तीच नाव सांग ." मी पुन्हा विचारलं .
" अरे खरच नाही माहीत ." म्हणत त्याने खिशातुन शंभरची नोट काढली आणि बंटीला देऊ लागला .
मी ती शंभरची नोट पटकन विकीच्या हातातून हिसकावुन घेतली .
" अभी नोट दे गपचुप ." बोलत तो माझ्या मुठीतली नोट घेण्याचा प्रयत्न करू लागला .
" आधी नाव .मग नोट " मी म्हणालो .
आमच्या दोघांची तिथेच बाचाबाची चालू होती तितक्यात,
" एक्सस्कुज मी " पाठीमागून नाजूक आवाज आला .
आवाज ओळखीचा वाटला म्हणून मी मागे वळून पाहिलं तर मागे ती उभी होती ' स्मिता ' तिला पाहून मी दगडाच्या मूर्तिसारखा तिथेच स्तब्ध झालो .याचा फायदा घेऊन विकीने माझ्या हातून त्याची नोट काढून घेतली पण मला आता त्याची पर्वा नव्हती .मी फक्त एकटक स्मिताकडेच पाहत होतो मगास पर्यंत संथपणे चालू असलेल माझ हृदय आता रेल्वेइंजिनासारख जोरजोरात धडधडत होत .
" एक्सस्कुज मी .....प्लीज " ती पुन्हा बोलली .
मी भानावर आलो आणि तिला स्टोरच्या काउंटरकडे जायला जागा दिली .सेकंड यीअरसाठी कॉलेज सुरू होऊन चार महीने झाले होते .फर्स्ट यीअरला तिला फक्त सोमवारी आणि मंगळवारी पाहण्यासाठी मी आठवडाभर वाट पाहायचो पण ह्या चार महिन्यात ती मला अजिबात दिसलीच नव्हती .आता तिला फक्त पाहतच रहावंस वाटत होत .पिवळ्या रंगाची सलवार कमीज़ तशाच मचिंग बांगड्या आणि बोटांच्या नखांवर तशाच रंगाची नेलपॉलिश .जिभेला बोट लावून ती झेरॉक्स कॉपीजची एक एक पेज मोजत होती कदाचित काही वेळापूर्वी तिने तिच्या नोट्स झेरॉक्ससाठी दिल्या होत्या .बंटी तिला काही तरी म्हणाला तेव्हा तिने तिच्या पर्समधून पाचशेची नोट काढून ओठांमधे पकडली आणि पर्समधे काही तरी शोधू लागली .तिला जे हवय ते तिच्या पर्समधे मिळालं नसाव तिने ती नोट पुन्हा पर्समधे ठेऊन एकवार माझ्याकडे पाहिलं .माझी नजर तिच्या नजरेला भिडली .
" फोर्टिएट रूपिज चेंज आहेत का प्लीज ." तिने विचारल .
पहिल्यांदा आमच्यात असा समोरा समोर संवाद होत होता .तिच्या नजरेला भिडलेली माझी नजर आणि तिचा आवाज ऐकून काही क्षण मी हरवून गेलो .
" त्याच्याकडे चेंज नाहीत ." विकी म्हणाला .त्याच्या आवाजाने मी भानावर आलो .
" ए ....एक ...मिनिट " बोलून मी खिशातून पाकीट बाहेर काढू लागलो .
हृदयाची धडधड मला स्पष्टपणे ऐकू येत होती .पाकीट उघडताना माझी बोटं थरथरत होती .कसेबसे पकिटातून मी तीस रुपये बाहेर काढले त्यात तितकेच पैसे होते .मी चोर खिशात हात घालून दोन पाच रुपयाचे डॉलर बाहेर काढले .डाव्या खिशातून अजून पाच रुपयाची चिल्लर काढली पण तरीही तीन रुपये कमी पडत होते .तीन रुपयासाठी आता इज्जत जाते आहे अस वाटू लागल .तेव्हाच मागच्या खिशाकडे हात गेला आणि तीन रुपये सापडले ते पैसे माझ्याकडून घेऊन तिने बंटीला दिले आणि माझ्या समोरून निघून गेली .तिच्या केसांत असलेल्या चाफ्याच्या फूलाचा सुगंध किती तरी वेळ मला जाणवत होता इतक्यात माझ्या डोक्यावर जोराची टपली बसली .
" मी पैसे मागितले तेव्हा तुझ्याकडे पैसे नव्हते तिने मागितल्यावर कुठून सुट्टे पैसे आले रे ? ?" विकीने रागात विचारलं.
" अरे ते खिशात होते मला माहीत नव्हत ." मी उत्तर दिल .
" गप .तुझ्यासारखे मुलांकडे मित्राला द्यायला पैसे नसतात पण कोणत्या मुलीने मागितले तर चोर खिशातून सुद्धा पैसे काढून देता .तुम्ही लोक म्हणजे ना ........" बोलत तो क्लास लमध्ये जाण्यासाठी जिना चढू लागला .त्याच्या पाठोपाठ मी ही जाऊ लागलो त्याची बडबड चालूच होती पण माझ त्या कडे लक्ष नव्हतं तिला पाहिल्यापासून माझा मूडच बदलून गेला होता .संपूर्ण शरीर रोमांचित झाल होत तिला पुन्हा एकदा भेटायची फार इच्छा होत होती पण भेटायला काहीतरी कारण तर हव ना .
आम्ही जिना चढून सहाव्या मजल्यावर आलो .
" ए अभी, तू तिला सुट्टे पैसे दिलेस ना मग ती तुला तुझे पैसे परत कधी करणार ??" विकीने विचारल.
मी तिच्याकडे पैसे मागायलाच विसरलो होतो .माझ्या डोक्यात ट्यूब पेटली .तिला पुन्हा भेटायच कारण मिळाल होतं .
" थांब मी तिला विचारून येतो ." बोलून मी तिथून धावत खाली आलो .
लायब्ररीमधे येऊन पाहिलं तर ती आतमध्ये नव्हती .मी पूर्ण लायब्ररी शोधली पण ती कुठेही नव्हती कदाचित गेली असावी .काही वेळासाठी मला थोड वाईट वाटलं पण तिला पुन्हा भेटायच काही ना कारण आता माझ्याकडे होत म्हणून मी खुश होतो .
त्या दिवशी घरी आल्यावर तिला पुन्हा कधी भेटतोय याची ओढ लागली होती . त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवार होता . खरतर विकेंड हा प्रत्येकाला हवा असतो पण आजचा रविवार मला अगदी नकोसा झाला होता तिला भेटावस वाटत होत .दुसऱ्या दिवशी कॉलेजमधे आल्यावर मी पहिल्या लेक्चरपासून लंचटाइमनंतरचा पहिला लेक्चर कधी येतोय याची वाट पाहत होतो त्याच टाईमला शनिवारी विकी लायब्ररीकडे गेला होता .आजही तो निघाला की त्या बरोबर मी निघणार होतो मला काहीही करून स्मिताला भेटायचं होत .लंचटाइममध्ये आम्ही क्लासमध्येच टिफिन संपवला आता कधी विकी बाहेर पडतोय याची मी वाट पाहू लागलो पण विकीची काहीच हालचाल दिसत नव्हती .लंचटाइम संपायला आता फक्त दोनच मिनिट बाकी राहिली होती तरीही विकी आरामातच बसला होता .मी त्याला लायब्ररीकडे जाण्याबद्दल विचारणार इतक्यात दीक्षित मॅमने क्लासमधे एंट्री केली .तेव्हा मला त्यांचा फार राग आला होता .दीक्षित मॅम नेहमी लेक्चरच्या पाच दहा मिनिट आधीच क्लासमध्ये यायच्या तशाच आजही आल्या होत्या .आता हा लेक्चर संपल्याशिवाय आम्हाला बाहेर जाण मुश्किल होत .स्मिता आता भेटेल की नाही याची गॅरंटी नव्हती .शनिवारी आम्ही याच लेक्चरला बंक मारून लायब्ररीजवळ गेलो होतो पण लेक्चर संपेपर्यंत मी पुन्हा तिला भेटायला गेलो तेव्हा ती निघून गेली होती .हा लेक्चर संपल्यावर लगेच लायब्ररीकडे जाण गरजेच होत तर तिला भेटण्याचे काही चान्सेस होते .
लेक्चर संपत आला होता पण अजूनही विकी आरामात बसलेला दिसत होता त्याच्याकडे पाहून वाटत नव्हत की तो या नंतरच्या लेक्चरला तरी बंक मारेल शेवटी मला राहावल नाही मी त्याला विचारलच .
" विकी आज बर्डवॉचिंगला नाही जाणार का ?"
सुंदर मुलींना मूल जेव्हा पाहतात तेव्हा त्याला कोड लँग्वेजमधे बर्ड वॉचिंग म्हणतात हे मला विकिकडूनच कळलं होतं .
" बर्डस अजून पिंजर्यातच आहेत बाहेर यायला वेळ लागेल ." विकी म्हणाला .
" म्हणजे ?"
" म्हणजे आज बी एस्सीच प्रॅक्टीकल होत .आता त्यांचा लास्ट लेक्चर चालू असेल .नेक्स्ट लेक्चरला जाऊ ." विकी म्हणाला .
खरच हा विकी पण ना .त्याने बी एस्सीच पूर्ण टाईमटेबल माहीत करून घेतल होत .दुसरा लेक्चर सुरू झाला हा रावसरांचा लेक्चर होता .ते शिकवायचे चांगले पण थोडे तापट होते त्यांच्या लेक्चरला कोण ना कोणतरी ओरडा खायचाच .आजही लास्टबेंचवरून कोणी तरी कमेंट पास केली आणि राव नेहमी प्रमाणे सुरू झाले त्यांच ओरडणं सुरू असताना त्यांच एक वाक्य माझ्या कानावर आलं .
" अभ्यास करायचा नसतो तर कशाला येता कॉलेजमध्ये ?
तुम्ही तुमच्या आईबापाला फसवत आहात समजलं ."
त्यांच हे वाक्य ऐकून माझ मन विचलीत झाल .मी विचारात पडलो .कारण इथे येण्यापूर्वी मी पप्पांना प्रॉमिस केल होत की मी त्यांनी सांगीतलेल्या मुलीशीच लग्न करीन .इतकच नाही मी मनाशी पक्क ठरवल होत की स्मिताला पूर्णपणे विसरून जाईन तिचा विचारसुद्धा मनात आणणार नाही .मग मी आता स्मिताला भेटण्यासाठी हे जे काही करत होतो तो निव्वळ मूर्खपणा होता .जी मुलगी मला कधी मिळणारच नाही तिच्या मागे जाऊन काय फायदा ? तिच्याशी ओळख वाढवून मी स्वतःला अजूनच तिच्यात इंव्हॉल्व करत होतो .ज्याचा त्रास भविष्यात मलाच होणार होता कारण ती कधीच माझी होणार नव्हती .राव सरांचा लेक्चर संपेपर्यंत मी हाच विचार करत होतो .सर जसे क्लासरूमच्या बाहेर गेले तसा विकीही बी एस्सीच्या लायब्ररीकडे जायला निघाला .मलाहीसोबत घेऊन जात होता पण मीच नाही म्हणालो हे सगळ इथेच थांबवण मला योग्य
Comments (0)