कदाचित हेच आहे प्रेम - अभिषेक दळवी (best e reader for manga txt) 📗
- Author: अभिषेक दळवी
Book online «कदाचित हेच आहे प्रेम - अभिषेक दळवी (best e reader for manga txt) 📗». Author अभिषेक दळवी
सुदैवाने मला मित्रही चांगले भेटले .देव आणि विकी माझे रूममेट्स होते .देव म्हणजे देवानंद बागवे तो कोल्हापूरचा होता .देव तसा थोडाफार भित्राच होता त्याच्या भित्रेपणालाही कारण होतं त्याचे वडील चार वर्षापूर्वी वारले होते आणि आई शाळेत शिक्षिका होती त्याच आयुष्य त्याच्या डिग्रीवरच अवलंबून होत अशा परिस्थितीमुळेच त्याच्यात भित्रेपणा आला असावा . विकी याच्या अगदी उलट विकी म्हणजे विक्रांत धोत्रे तो मुंबईचा होता .त्याची ही माझ्यासारखीच परिस्थिती होती .त्याला अॅक्टर व्हायच होत पण घरच्यांच्या प्रेशरमुळे तो इंजिनियरिंग करत होता .तो चांगला फुटबॉल प्लेयर ही होता म्हणून आमचं चांगल जमायच .तो पूर्णपणे बिनधास्त मुलगा होता त्याच्याबरोबर राहून राहूनच मी दुनियादारी शिकू लागलो होतो .नाहीतर कोणा प्रोफ़ेसरला रात्रभर वॉशरूममधे बंद करायची हिम्मत मी कधीच केली नसती .
कॉलेजमधे मी अभ्यासाशिवाय बऱ्याच गोष्टी करत होतो .इथे येऊन फार काही शिकायला मिळत होतं .एक सुधीर नावाचा मुलगा होता .परिस्थितीने फार गरीब होता त्याचे वडील ऑटो चालवायचे आणि आई भाजी विकायची .तो अभ्यासात फार काही हुशार नव्हता पण त्याच डोक कमालीच फास्ट चालायचं .आमचे प्रोफ़ेसर आम्हाला नोटस द्यायचे आणि आम्ही त्याचे झेरॉक्स काढायचो .तो स्वतःहा पहिल्यांदा प्रोफ़ेसर्सकडे जाऊन ओरिजिनल कॉपी घ्यायचा आणि सर्व मुलांसाठी झेरॉक्स काढायचा .कॉलेज सूटेपर्यंत आमच्याकडून पैसे घेऊन त्या आम्हाला झेरॉक्स कॉपीज द्यायचा .कॉलेजमध्ये एक झेरॉक्सच दुकान होत पण तिथे नेहमी गर्दी असायची गर्दीत उभ राहण्यापेक्षा आम्ही त्याच्याकडूनच झेरॉक्स घेण पसंत करायचो जेवढे पैसे झेरॉक्सवाला घायचा तितकेच पैसे तो घ्यायचा .तो अस सर्वांसाठी झेरॉक्स का काढून आणतो ? हा प्रश्न नेहमी माझ्या मनात यायचा .एकदा मी त्याला त्याच्या या समाजसेवेच कारण विचारलचं .तेव्हा त्याने जे सांगितल त्या वरून तो किती ग्रेट आहे हे माझ्या लक्षात आलं .आमच्या कॉलेजमधल्या दुकानात एका झेरॉक्सच्या पेजचे एक रुपये घ्यायचे पण कॉलेजपासून दहा मिनिटावर एक झेरॉक्सच दुकान होत तिथे एका पेजचे ७५ पैसे आणि ५० पेक्षा जास्त पेज असतील तर प्रत्येक पेज ५० पैसे घ्यायचे .सुधीर ब्रेकमध्ये तिथे जायचा . एका नोट्समध्ये किमान पाच पेज तरी असायचे .नव्वद मुलांसाठी नोट्सच्या झेरॉक्स काढेपर्यंत वेळ लागायचा हा त्या वेळात तिथेच बसून टिफिन खायचा आणि ब्रेकसंपेपर्यंत क्लासमध्ये येऊन आम्हाला नोट्सच्या झेरॉक्स विकायचा .एका मुलाकडून एका झेरॉक्सचे पाच रुपये जरी मिळाले तरी शहाऐंशी मुलांकडून एका नोटसचे ४५० रुपये सहज मिळायचे . त्यातले अर्धे म्हणजे २५० रु त्याचं प्रॉफिट असायच .एका आठवड्याला आम्हाला किमान १२ ते १५ नोटस मिळायच्या म्हणजे त्याची एका आठवड्याची कमाई तीन हजारपेक्षा जास्त होती आणि महिन्याला त्याला १२००० हजार पेक्षा जास्त पैसे झेरॉक्स मधून सहज मिळत होते .जर हिशोब केला तर त्याची ही कमाई आमच्या कॉलेजच्या फी पेक्षा जास्त होती .
सुधीरला पाहून माझ्या पप्पांच एक वाक्य मला आठवायचं ते म्हणजे,
" बिजनेस हा प्रत्येक गोष्टीत आहे फक्त थोड डोक लावण्याची आणि मेहनत करण्याची गरज असते .पण प्रत्येकाला हे नाही जमत ."
सुधीर जिथून अर्ध्या किमतीत नोट्सच्या झेरॉक्स घ्यायचा ते दुकान सगळ्याना माहीत होत .काही जणांनी त्याला कॉपी करण्याचा प्रयत्न केला होता पण कोणीच त्याला कॉम्पिटिशन देऊ शकले नाही .
आम्ही कधी कधी एकत्र उशीरापर्यंत लायब्ररीत बसायचो तेव्हा सहज विषय निघायचा डिग्रीनंतर पुढे काय करायचं .प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या मल्टीनॅशनल कंपनीच नाव घेऊन तिथे तिथे जॉब करायची इच्छा बोलून दाखवायचा पण सुधीरला कुठे जॉब करायची अजिबात हौस नव्हती .त्याला स्वतःच वर्कशॉप सुरू करायच होतं . आमच्यातले एक दोघं त्याला म्हणायचे
" छोट मोठ वर्कशॉप सुरू करून काय तीर मारणार आहेस ? मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत जॉब ट्राय कर एक स्टेटस मिळेल ."
यावर तो जे उत्तर द्यायचा त्यावरून सगळ्यांची बोलती बंद व्हायची .
" अरे तुम्ही ज्या कंपनीत काम कराल तिथे तुमच्या सारखे छप्पन असतील .ती कंपनी पैशांच पॅकेज देऊन तुमच्याकडून काम करवून घेईल तुम्ही नाही करू शकलात तर तुमच्यासारखे दूसरे सहज त्यांना भेटतील .पण इथे माझी मार्केटमधे एक ओळख असेल आणि जर बिजनेस वाढला तर जिथे तुम्ही काम करत असाल त्या कंपन्यांशी मी डायरेक्ट डील करू शकेन. तस ही कोणत्याही मोठ्या कंपनीची सुरुवात छोट्या मोठ्या वर्कशॉपपासूनच होते ." हे सुधीरच उत्तर असायचं.
पप्पाही नेहमी असंच म्हणायचे .
" आपल्या मराठी माणसांना बिजनेस करायला नको .नोकऱ्या करायला पाहिजेत .अरे नोकऱ्या काय सगळेच करतात पण धंदा करण सगळ्यांना नाही जमतं.कारण धंदा करायला शिक्षण नाही अक्कल लागते पण ती सगळ्यांकडे नसते ."
जसजशी जगाशी माझी ओळख वाढत गेली तस तस मला पप्पांचं म्हणणं पटू लागलं .
आमच्या प्रोफ़ेसर्सच मंथली इनकम जास्तीच जास्त तीस ते पस्तीस हजार होत. कॉलेजमधे एका परेश नावाच्या गुजराथी माणसाच झेरॉक्सच दुकान होत आणि कॉलेजच कँटीन ही त्याचच होत . तसा तो दहावी नापास होता तरी त्याची फक्त झेरॉक्सच्या दुकानातून महिन्याची कमाई चाळीस हजारांपेक्षा सहज जास्त असायची आणि आमच्या उच्चशिक्षित प्रोफ़ेसरचा महिन्याचा पगार त्या पेक्षा कमी होता .यावरून एक किस्सा मला नेहमी आठवतो .
हिटलरचा जेव्हा लेक्चर असायचा तेव्हा त्याला अटेंडन्स पूर्ण लागायची कोण अपसेंट राहिला तर दुसऱ्या दिवशी त्याला सर्वांसमोर फार सुनवायचा आणि एक डायलॉग त्याचा फार फेमस होता .
" तुम्हा लोकांना साधा लेक्चर अटेंड करता येत नाही. तुम्ही आयुष्यात काही नाही करू शकत "
सगळ्यांनी फार ऐकून घेतलं आणि एक दिवशी मागच्या बेंचवरून कोणीतरी जोरात ओरडलं .
" सर, कमीत कमी झेरॉक्स दुकान तरी नक्कीच टाकू शकतो ."
तेव्हा हिटलरचा चेहरा बघण्यासारखा झाला होता .
आम्ही कधी परेशभाईंना दुकानात किंवा कँटीनमधे भेटलो की त्यांना चिडवायचो .
" क्या परेशभाई इतने बड़े कॉलेज मे धंदा करते हो कमसे कम बारहवीं तक तो पढ़ाई कर लेते ।"
त्यावर ते फार सुंदर उत्तर द्यायचे .
" बेटे हम अनपढ़ है इसीलिए धंदा कर रहे है अगर पढे लिखे होते तो नौकरी करने में जिंदगी बिता देते। हम दसवीं में फेल हुए थे अगर दसवीं पास हो जाते तो हमारा बाप किसी सरकारी कचेरी में चपरासी की नौकरी पर लगवा देता और बारहवीं तक पहुँचते तो स्कुल मे मास्टर बनना तो तय था।
मगर हमे नौकरी नही करनी थी धंदा करना था। घर से झगड़ कर यहाँ आए चाचा के दुकान मे पाँच साल काम किया उसी से कर्जा लेके यहा कँटीन शुरू किया । बाद मे यह झेरॉक्स की दुकान और फिर कुछ समय बाद बाहर और दो दुकाने शुरू कर दी। दो साल पहले ही अपने गाँव मे माँ के नाम से स्कूल भी शुरू किया है। देखो कई चीज़े ऐसी होती है जिनमें हुनर की ज़रूरत होती है पढ़ाई की नही। अगर हम पढ़ाई करने मे वक्त बर्बाद करते तो आज सिर्फ एक मास्टर होते लेकिन हमने वही वक्त अपना सपना पूरे करने मे लगाया और आज एक स्कूल के मालिक है।"
माझ्या पप्पांची स्टोरी ही अशीच होती .
माझे आजोबा रिटायर्ड स्टेशन मास्तर होते.त्यांची इच्छा होती की पप्पांनीही सरकारी नोकरी करावी. त्यांच्या समाधानासाठी पप्पांनी रेल्वेची परीक्षा दिली त्या काळी रेल्वेच्या नोकरीला फार मागणी होती .रेल्वेत काम करणारा गावाला फार मोठा अधिकारी समजला जायचा .पप्पांना रेल्वेत नोकरी लागलीसूद्धा होती पण पप्पांना बिजनेस करायचा होता ते जेव्हा पण आजोबांकडे हा विषय काढायचे आजोबांच एकच उत्तर असायच .
" धंदा करावा तो गुजराती आणि मारवाड़ी लोकांनी आपण मराठी माणसांनी एक तर शेती करावी किंवा नोकरी ."
पप्पांच्या बिजनेसला आधीपासून आजोबांचा विरोध होता पण तरीही पप्पा भांडून आपल्या हिस्स्याची जमीन विकून शहरात आले आणि चार ट्रक घेऊन ट्रान्सपोर्टचा छोटा बिजनेस सुरू केला . सुरुवातीला लॉस सहन करावा लागला पण त्यांनी हार नाही मानली प्रयत्न करत राहिले आणि आज १२० ट्रक, १४ गोदाम इतकंच नाही केबल आणि हॉटेलिंगच्या बिजनेसमध्ये पार्टनरशीप इतका मोठा बिजनेस उभा केला .
पप्पा मला नेहमी सांगायचे .
" तुझे आजोबा मला नेहमी म्हणायचे ' नोकरी कर धंदा नको करू ' त्यांच ऐकत बसलो असतो तर आज करोडोंचा मालक असण्याऐवजी काही हजाराची पेन्शन घेणारा एखादा अधिकारी असलो असतो ." हे सर्व पाहून कधी कधी मला मी फार लकी असल्याचा फील यायचा कारण मला बिजनेससाठी घरून कोणाचा विरोध नव्हता उलट पप्पांचा बिजनेसही मीच सांभाळणार होतो .
एकंदरीत सगळं चांगल चालू होतं.मेस केव्हाच बदलली होती .कॉलेजमधे ग्रुपही चांगला मिळाला होता .विकीमुळे फुटबॉल प्रॅक्टीसही चांगली चालली होती .एका गोष्टीवरून विकीला मात्र नेहमी वाईट वाटायचं फक्त विकीलाच नाही तर आमच्या क्लासमधल्या सर्वच मुलांना एका गोष्टीची खंत वाटायची ती म्हणजे आमच्या क्लासमध्ये एकूण मूल पंच्याऐंशी आणि मुली फक्त पाचच होत्या . मेकॅनिकलला मुली कमी असतात हे आधी मी फक्त ऐकलं होतं पण त्या किती कमी असतात ते आज पाहत होतो .
शाळेत असताना आमच्या मॅडम नेहमी म्हणायच्या .
" आपल्या देशात नेहमीच पुरुषांनी स्त्रियांवर अत्याचार केले म्हणून आज मुलांच्या मानाने मुलींची संख्या कमी आहे .आपण हे आताच थांबवायला हव नाहीतर भविष्यात याचे परीणाम दिसतील ."
खरच ज्या कोणा पुरुषांनी स्त्रियांवर अत्याचार केले होते त्यांचा मला आता राग येत होता कारण त्यांच्या चुकीचे परिणाम आमच्या क्लासमधल्या मुलांना भोगावे लागत होते .आमच्या क्लासमधली जवळ जवळ सगळीच मूल त्या पाच मुलींच्या अवती भवतीच असायची अर्थात त्यांची यात काही चूक नाही वाढत्या वयाबरोबर मुलामुलींमधे आकर्षण हे वाढण हे नैसर्गिकच आहे.
सगळ्यात जास्त मजा प्रॅक्टीकलमधे यायची .प्रॅक्टिकलसाठी आमच्या चार बॅच होत्या .आमच्या बॅचमध्ये तीन मुली आणि दुसऱ्या एका बॅचमध्ये दोन मुली होत्या बाकीच्या दोन बॅचमध्ये एकही मुलगी नव्हती. त्या बॅचची मूल आमच्या बॅचला लकी बॅच म्हणायचे .प्रॅक्टीकलमधून जरा वेळ भेटला की सगळे मुलगे त्या चार मुलींच्या भोवती गोळा व्हायचे .कोणी जोक काय सांगायाच , कोण किस्से सांगायच , प्रत्येकजण त्या मुलींना इंप्रेस करायचा फक्त चान्स शोधत असायचे . आम्ही साध एक पेन मागितल तर नालायक अर्धी संपलेली रिफिल द्यायचे आणि त्या मुलींनी एकाकडे काही मागितलं तर दहा दहा जण घेऊन हजर व्हायचे .त्या पाच मुलींमधल्या तिघी फारच लबाड होत्या .मुलांशी गोडगोड बोलून काम करवून घ्यायच्या. एक दीप्ती नावाची मुलगी होती तिने तर देवला बकराच बनवून टाकलं होतं .ती तिच्या सगळ्या असाइंटमेंट देवकडून पूर्ण करून घ्यायची आणि तो ही रात्रभर जागून स्वतःसोबत तिच्या असाईंटमेंटसुद्धा पूर्ण करायचा .आम्ही त्याला अनेकदा समजावल होत की ती तुझा वापर करतेय पण त्याच नेहमी एकच उत्तर असायचं .
" आम्ही फ्रेंड्स आहोत आणि मैत्रीत एकमेकांना मदत करायची असते ."
देव तसा आधीपासूनच भोळसट होता . त्यात कोणा मुलीने मदत मागितली की त्यातला समाजसेवक जागा व्हायचा . आम्ही एक दोनदा दीप्तीशीही बोलून पाहील तेव्हा ती आम्हाला,
" ही देव आणि माझ्यातली गोष्ट आहे तुम्ही दोघ त्यात लक्ष नका घालू ." अस उत्तर द्यायची .
शेवटी मी आणि विकीनेच देवला दीप्तीपासून मुक्ती मिळवून द्यायचं ठरवल .
एकदा सबमिशनच्या आदल्या दिवशी तिने तिची अर्धवट असलेली असाईंटमेंट देवला पूर्ण करायला दिली होती .तिने फक्त असाईंटमेंटमधली दहाचं पान लिहली होती बाकीची पंधरा पान देवने लिहली आणि त्या नंतर तो झोपला .रात्री एक वाजता उठून मी आणि विकीने ती असाईंटमेंट देवच्या बॅगमधून काढली . दीप्तीने लिहलेल्या दहा पानांवर टोमॅटो सॉस सांडून ती असाईंटमेंट पुन्हा देवच्या बॅगमधे ठेवून दिली .दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये त्या दोघांमध्ये मोठ भांडण झाल, त्यानंतर दोन दिवस देव आमच्याशी बोलत नव्हता पण खरतर आम्ही त्याला तिच्यापासून वाचवलं होत .तिने त्यानंतर त्याला कोणतंही काम सांगितल नाही .
खर सांगायचं तर त्या मुलींच्या मागे मागे जाणाऱ्या आमच्या क्लास्समधल्या मुलांमधे मी नव्हतो .का ते माहीत नाही पण त्या मुलींमधे मला कधीच इंटरेस्ट वाटला नाही .असंही मी आधीपासून मुलींपासून चार हात लांबच असायचो .मम्मी लहानपणी नेहमी मला सांगायची .
" शाळेतल्या मुली आपल्या बहिणी सारख्या असतात ."
म्हणून मी लहान असताना माझ्या क्लासमधल्या सगळ्या मुलींना बहीण मानायचो .यामुळे दादा मला फार चिडवायचा कारण जेव्हा त्याचा हातावर मुलींनी बांधलेले फ्रेंडशिप बॅंड असायचे तेव्हा माझ्या हातावर राख्या असायच्या . कॉलेजला गेल्यावरही मी मुलींशी फार क्वचित बोलायचो तर दादा त्याच्या मोबाईलवरून रात्री बारा एक पर्यंत मुलींशी बोलत असायचा .कॉलेजला असताना काही मुली स्वतःहून माझ्याशी बोलायल्या यायच्या .दोघीनी तर मला प्रपोजसूद्धा केल होत पण मीच नाही म्हणालो .त्या दिसायला फार सुंदर होत्या पण त्या मुलांबाबतीत सिरीयस नव्हत्या . मला प्रपोज करण्याआधी त्यांची किमान तीन चार अफेयर्स झाली होती .अशा टाईमपास रिलेशनशिपमधे मला अजिबात रस नव्हता .पृथ्वीराज -संयोगिता , बाजीराव -मस्तानी यांच्याबद्दल मी लहानपणापासून ऐकत आलो होतो . मला अशी मुलगी हवी होती जी फक्त माझ्यासाठी बनली असेल आणि मी तिच्यासाठी .आमच्या दोघांच्या आयुष्यात आम्हा दोघांशिवाय दुसर कोणी नाही . सरळ भाषेत सांगायच तर एकही अफेयर नसलेली मुलगी .अर्थात प्रत्येक सभ्य मुलाची अशीच अपेक्षा असते तशीच माझीही होती .दादा मला नेहमी म्हणायचा,
" एकही अफेयर नसलेली सुंदर मुलगी तुला अजिबात मिळणार नाही .जमाना बदललाय रे आजकाल मुलीही टाईमपासच करतात .प्रेम वैगरे फक्त पिक्चरमधे असत .आता बघ ना तू मुलींमधे सिरीयस होतोस तुला एकही गर्लफ्रेंड नाही आणि मी एका वर्षात किमान पाच मुलींबरोबर टाईमपास करतो ."
मला दादाच्या सगळ्या गोष्टी योग्य वाटायच्या .पण त्याच्या या मताशी मी अजिबात सहमत नव्हतो .सगळ्याच मुली सारख्या नसतात .मला नेहमी वाटायच जगात कुठेतरी माझ्या सारखाच विचार करणारी माझ्यासारखीच एखादी मुलगी असेल .पण अद्याप मला तशी मुलगी काही सापडली नव्हती .
जेव्हा मी असा काहीसा विचार करायचो तेव्हा माझ्यासमोर तिचा चेहरा यायचा जिला मी कॉलेजच्या पहिल्या दिवशी बी एस्सीच्या क्लासमध्ये पाहिलं होतं .तिला मधल्या काळात मी पूर्णपणे विसरून गेलो होतो पण दोनच दिवसापूर्वी ती मला दिसली होती .
आमची फर्स्ट सेमिस्टर संपून सेकेंड सेमीस्टर सुरू झाली होती .दुसऱ्याच दिवशी दोन लेक्चर ऑफ होते .दिक्षीत मॅमनी असाईंटमेंट दिली होती तीच
Comments (0)